ताज्या घडामोडी

माटुंगा लेबर कॅम्प मध्ये भीम जयंतीची धूम

 

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त माटुंगा लेबर कॅम्प मध्ये ठिक ठिकाणी डॉ आंबेडकर यांच्या जीवनावर देखावे , सजावट व आरास करण्यात आली होती.* *माटुंगा लेबर कॅम्प मधील सर्वांचे आकर्षण ठरलेले ठराविक मंडळाचे देखावे यामध्ये संकल्प सांस्कृतिक संस्था यांचा बोधगया येथील बिहार आणि बोधी वृक्ष , रॉयल वेल्फेअर असोसिअशन यांनी साकारलेले कोलंबिया विद्यापीठ , सहयोग सामाजिक संस्था यांचा भारतीय संविधान आणि सम्राट अशोक मंडळ यांनी मांडलेली सद्यस्थिती तर काहींनी संविधान पुस्तकांची प्रतिमा व डॉ आंबेडकरांचा चवदार तळ्यावरिल सत्याग्रह यांचे हुबेहूब देखावा. हे पाहण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.

या बरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक कमिटी 2025 चे अध्यक्ष दिपक वाघ यांनी विभागातील तमाम राजकीय पक्ष , आंबेडकर चळवळीचे सर्व गट – तट आणि भीम अनुयायी यांना मिरवणुकीत सामील होण्यासाठी जे आव्हान केले होते त्याला प्रतिसाद देऊन शिवसेना ( ठाकरे ) गटाच्या माजी नगरसेविका हर्शला मोरे , समाजसेवक आशिष मोरे , आमदार ज्योती गायकवाड , खासदार वर्षां गायकवाड , ब्लॅक पँथर चे विजय सरतापे ,बाबा लोंढे , डी के कांबळे , नरसिंग गुर्रम , अनिल भंडारे , डॉ सावंत , त्रिमूर्ती मित्र चे रमेश काळे , राजू पंडित ,शेखर घनवजिर , मनसेचे सूर्यकांत भालेराव , वंचित आघाडीचे सुनील कांबळे , मिलिंद काळे , शिवाय राष्ट्रवादी पवार गटाचे जिल्हाध्यक्ष गन्भोर , शिंदे सेनेचे रिडन फर्नांडिस व विभागातील नागरिक हजारोंच्या संख्येनं सामील झाले होते. मिरवणुकीत महेंद्र साळवे फॅन क्लब च्या वतीने डॉ आंबेडकर यांच्या स्वाक्षरी असलेले पेन , ज्यूस , सेनेच्या वतीने कोल्ड ड्रिंक्स , वंचित च्या वतीने ज्यूस व आइस क्रीम राष्ट्रवादीच्या वतीने मीठाई वाटण्यात आली. एसीपी भोर व शाहू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव शिरसाठ यांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. ढोल ताशा ,बँजो , संबळ , नाशिक ढोल आणि डी जे च्या साहाय्याने सहा तास मिरवणूक कुठलेही गालबोट न लागता पार पडली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.