ताज्या घडामोडी

“स्वागताला मनाची आणि घराची दारं उघडी ठेवा…रितेश भाऊ घेऊन येत आहे महाराष्ट्राचं तुफान!”

मुंबई, 14 डिसेंबर २०२५: “स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय,” म्हणत रितेश देशमुख घेऊन येत आहे बिग बॉस मराठी सिझन ६. नव्या प्रोमोमुळे महाराष्ट्रात एकच चर्चा, एकच विषय घोळतोय बिग बॉस मराठी सिझन ६. सगळीकडे उत्साहाची लाट उसळली आहे. रितेश भाऊंचा मस्त लूक, दमदार स्वॅग प्रेक्षकांची मने जिंकत आहे. “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय…आहात ना तय्यार!” भाऊच्या या वाक्याने प्रेक्षकांची धडधड अजूनच वाढली आहे. नव्या सिझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मागील सिझनने जबरदस्त धुमशान घातलं आणि यंदाच्या सिझनमध्ये Swag तोच असणार आहे, पण पॅटर्न रितेश भाऊंचा असणार आहे. काय पॅटर्न असणार? कसा लूक असणार? सदस्य कोण असणार? सगळं अजून गुलदस्त्यात आहे. बिग बॉस मराठी सिझन ६ – ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वा. कलर्स मराठी आणि JioHotstar वर!

भाऊच्या एंट्रीसाठी उभारलेला आलिशान सेट, भव्य मिरवणुकीचे वातावरण, ढोल–ताशांचा गजर, रंगीबेरंगी रोषणाई आणि तब्बल २५० ते ३०० लोकांची दणदणीत उपस्थिती या सगळ्यांच्या साक्षीने पार पडला बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचा लार्जर-दॅन-लाईफ प्रोमो. रितेश भाऊने पहिल्यांदाच प्रोमोमध्ये पारंपरिक वेशभूषा केली आहे. प्रत्येक फ्रेममध्ये त्यांचा दिसणारा स्वॅग प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या नव्या प्रोमोने बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचा बिगुल वाजला आहे. दरम्यान, सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे आणि चर्चेत आहेत प्रोमोमधले रितेश भाऊंचे कडक डायलॉग… घरात कुणाचा नवस पूरा होणार? तर कुणाच्या सलामीने वातावरण झिंगणार? “काही असे हि असणार… पण, मी गप्प नाही बसणार…! अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत लवकरच!

या सिझनमुळे लागणार महाराष्ट्राला वेड… सज्ज व्हा! बिग बॉस मराठी सिझन ६ – ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वा. कलर्स मराठी आणि JioHotstar वर!

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.