मराठी चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये ‘लोकीज स्टुडिओ’ आघाडीवर!

मराठी चित्रपटसृष्टीत प्रमोशनच्या नवनवीन पद्धतींचा ठसा उमटवणाऱ्या क्रिएटिव्ह एजन्सींच्या यादीत आज सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांनी स्थापन केलेलं लोकीज स्टुडिओ. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपट आणि मराठी मालिकांसाठीही दर्जेदार क्रिएटिव्ह कॅम्पेन्स तयार करत हे स्टुडिओ आज इंडस्ट्रीतील सर्वात विश्वासार्ह नाव ठरत आहे.
गेल्या काही वर्षांत लोकीज स्टुडिओने ‘बाईपण भारी देवा’, ‘संगीत मानापमान’, ‘पंचक’, ‘धर्मवीर’, ‘बॉईज’, ‘फुले’, ‘खाशाबा’, ‘एक दोन तीन चार’, ‘किर्रर्र काटा किर्रर्र’, ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ अशा अनेक चित्रपटांसाठी आणि ‘बिग बॉस मराठी’ सारख्या मोठ्या कॅम्पेन्ससाठी केलेल्या पोस्टर डिझाईन्स, स्टिल्स, मोशन पोस्टर्स आणि व्हिज्युअल्सनी मराठी इंडस्ट्रीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधणारा सर्वात प्रभावी क्षण असतो. आणि हाच क्षण प्रभावी बनवण्याची कला सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांच्या क्रिएटिव्ह दृष्टीला साथ देणाऱ्या लोकीज स्टुडिओने सातत्याने सिद्ध केली आहे. त्यांच्या डिझाईन्सची शैली, रंगसंगती, कॉन्सेप्टची स्पष्ट लाईन आणि प्रेक्षकांना थेट जोडणारा व्हिज्युअल कनेक्ट या सर्व गोष्टी प्रत्येक चित्रपटाची प्रमोशनल आयडेंटिटी आगळीवेगळी बनवतात.
या स्टुडिओची खासियत म्हणजे प्रत्येक प्रकल्पाला त्याच्या विषय, जॉनर आणि टोनशी सुसंगत अशी स्वतंत्र व्हिज्युअल ओळख देण्याचं कौशल्य. कौटुंबिक चित्रपट असो वा ऐतिहासिक; भावनिक कथा असो वा अॅक्शन, प्रत्येक मोहिमेसाठी वेगळा दृष्टिकोन तयार करणं ही त्यांची जमेची बाजू आहे.
फक्त प्रमोशन नव्हे, तर निर्मिती क्षेत्रातही लोकीज स्टुडिओने आपली छाप सोडली आहे.
‘विक्की व्हेलिंगकर’, ‘बायकर्स अड्डा’ या मराठी चित्रपटांचे त्यांनी निर्मिती केली असून, सुप्रसिद्ध ‘हंपी’ या चित्रपटाच्या लाईन प्रोडक्शनची धुरा सुद्धा सांभाळली आहे. या अनुभवांमुळे कथावस्तू समजून घेऊन तिचं व्हिज्युअल ब्रँडिंग नेमकेपणाने सादर करण्याची स्टुडिओची क्षमता आणखी मजबूत झाली आहे.
आज अनेक दिग्दर्शक आणि निर्माते आपल्या आगामी चित्रपटांच्या आणि मालिकांच्या प्रमोशनसाठी सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांच्या लोकीज स्टुडिओवर पूर्ण विश्वासानं जबाबदारी सोपवतात.
मराठी तसेच हिंदी इंडस्ट्रीत डिजिटल प्रमोशन आणि व्हिज्युअल ब्रँडिंगचा स्तर उंचावण्यात लोकीज स्टुडिओचे योगदान अनन्यसाधारण आहे. नवनवीन प्रयोग, ताज्या कल्पना आणि व्हिज्युअल स्टोरीटेलिंगची नवी भाषा वापरत हा स्टुडिओ आज इंडस्ट्रीत व्हिज्युअल प्रमोशनचे आघाडीचे नाव बनले आहे.
