क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

प्रतिपंढरपुरात ‘माई मीडिया 24’ चे भाविकांना लाडू व चिक्की वाटप

पांडुरंग भेटीची ओढ लागलेले वारकरी “भेटी लागे जीवा” म्हणत पंढरपुरात ऊन वारा पावसाची तमा न बाळगता विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण वर्षभर वाट पहात असतात.

मुंबईतील वडाळा येथे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरातही दर्शनासाठी पहाटेपासून रांग लागते. भक्तसेवा हीच ईश्वर सेवा’ मानून “माई मीडिया 24” च्या वतीने रविवारी पांडुरंगभक्तांना पाकिटबंद (हायजिनिक) लाडू व चिक्कीचे वाटप करण्यात आले.

यासाठी फराळाचे सहकार्य लाभले ते “भूमिसम्राट”चे संपादक चंद्रकांत गोखले यांचे !
“माई मीडिया” च्या अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या मार्गदर्शनात माई चे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सचिन चिटणीस यांच्या पुढाकार व सक्रिय सहभागाने सदस्य गणेश तळेकर, विजय कांबळे यांनी या फराळाचे वाटप केले.

या फराळाचा लाभ ‘प्रसाद’ म्हणून मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला. यावेळी शिवसेनेचे नेते मा.खासदार विनायक राऊत ,आमदार महेश सामंत आणि अनेक मान्यवरांनी ही याचा लाभ घेऊन कौतुक केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.