क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

खो-खोचा तळागाळातील विकास ल क्षात घेत भारतीय खो-खो महासंघाकडून ५० लाख विद्यार्थ्यांच्या देशव्यापी नोंदणी मोहिमेस सुरुवात

नवी दिल्ली ११ नोव्हेंबर २०२४ – भारताच्या मातीत वाढलेल्या आणि तळागाळात रुजलेल्या खो-खो या स्वदेशी खेळाला बळकटी देण्यासाठी एक महत्वाचा उपक्रम म्हणून भारतीय खो-खो महासंघाने देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक व्यापक नोंदणी मोहिम सुरु केली आहे. भारत १३ ते १९ जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानावर पहिल्या वहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार आहे.

आंत्रप्रेन्युअर्स सोसायटीच्या (एसओडीई) सहकार्याने या डिजिटल नोंदणी मोहिमेने आधीच उल्लेखनीय प्रगती केली ाहे. भारकतभरातील ७,१३२ शहरे आणि १,१६० शाळांमधून ही नोंदणी हेणार आहे. दक्षिणेकडूील तेलंगणा राज्यापासून उत्तरेकडील उत्तर प्रदेश येथून आतापर्यंत इयत्त ६वी ते ११वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात नोंदणी केली आहे.

जानेारीत होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेपूर्वली ५० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे आमचे स्वप्न आहे. असे झाले, तर आम्ही ५० लाख कुटुंबियांना खो-खो विश्वाशी जोडू शकू, असे भारतीय खो-खो महासंघाचे सरचिटणीस श्री. एम. एस. त्यागी यांनी सांगितले. त्यागी यांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी आपला सहा वर्षाचा अनुभव पणाला लावला आहे. मी १९६४ पासून खो-खो खेळाशी प्रथम खेळाडू, नंतर प्रशिक्षक आणि आता महासंघाचा सरचिटणीस म्हणून खो-खो खेळाशी संलग्न आहे. कोणत्याही खेळाच्या विकास आणि प्रगतीसाठी अशा नोंदणीची आवश्यकता असल्याचेही त्यागी यांनी सांगितले.

खो-खो खेळाडूंची सर्वसमावेशक माहिती एकत्रित संकलित करण्यासाठी समाज माध्यम आणि डिजिटल व्यासपीठाचा फायदा होतो. याचा सर्वात मोटा फायदा असा की या नोंदणीमुळे सुरुवातीला एक खेळाडू येतो, नंतर त्याचे मित्र आमच्यामध्ये सामील होतात. पुढे ही मालिका त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचते, असे त्यागी यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष श्री सुधांशु मित्तल म्हणाले, भारताने २०३६च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाची दृष्टी निश्चित केली असताना आम्ही खो-खो ऑलिम्पिक मानांकनापर्यंत कसो पोहचेल यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. खेळाडूंची नोंदणी प्रक्रिया ही केवळ माहिती गोळाकरण्यासाठी नाही, तर यामुळे एक भक्कम परिसंस्था उभी राहणार आहे. खो-खो हा खेळ केवळ भारताचा अभिमान नसून जगाची कल्पकता जिंकणारा खेळ बनविण्याचे आमचे ध्येय आहे.

नोंदणी झालेल्या खेळाडूंना खेळण्याची संधी, संभाव्या कारकिर्द मार्गदर्शन आणि अन्य फायदा याबद्दल नियमित माहिती पुरवली जाईल. भारताचा क्रीडा वारसा जतन करण्याचे आणि त्याचे संवर्धन करताना तरुण खेळांडूसाठी एक शाश्वत मार्ग तयार करणे हा या नोंदणी मोहिमेचे उद्देश आहे.

आतापर्यंत अर्जेंटिना संघाने आगामी विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विश्वचषक स्पर्धा जवळ आल्यामुळे या नोंदणी कार्यक्रमाला गती मिळाली असून, खो-खो एका नवीन युगाच्या उंबरठ्यावर उभा आहे. यामुळे एक देशी स्थानिक खेळ जागतिक स्तरावर पाय ठेवण्यासाठी सज्ज आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.