क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रवाह पिक्चरवर पाहा अजरामर चित्रपट अमर भूपाळी

उलगडणार मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ

मराठी चित्रपटांच्या सुवर्ण इतिहासात अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे अमर भूपाळी. १९५१ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट लवकरच ७५ वर्ष पूर्ण करणार आहे. व्ही शांताराम यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला हा चित्रपट अभिनेत्री संध्या, ललिता पवार आणि पंडीतराव नगरकर अश्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने नटलेला आहे. अमर भूपाळी सिनेमातील लता मंगेशकर, आशा भोसले आणि पंडीतराव नगरकर यांच्या आवाजातील घनश्याम सुंदरा, लटपट लटपट आणि सांगा मुकुंद कुणी हा पाहिला… ही गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. ७५ वर्ष उलटून गेली तरी आजही ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. या चित्रपटाला संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. तर शाहीर होनाजी बाळा यांनी ही गाणी लिहीली होती.  

मराठी चित्रपटाचा हा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी चित्रपटांच्या इतिहासात अजरामर ठरलेला अमर भूपाळी सिनेमा प्रवाह पिक्चरवर पहाता येणार आहे. मराठी सिनेमांचं व्यापक रुप आपण अनुभवत असताना पुन्हा एकदा ब्लॅक ॲण्ड व्हाईट चित्रपटाच्या काळात जाण्याची संधी प्रवाह पिक्चर वाहिनी घेऊन आली आहे. गुढीपाडव्याच्या सणाचा जल्लोष आणि सहकुटुंब दुपारी १ वाजता अमर भुपाळी चित्रपट पहाण्याचा आनंद लुटायलाच हवा.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.