क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

निर्माती आणि समाजसेविका स्मिता ठाकरे यांच्या ‘ज्ञान दान’ उपक्रमांतर्गत वेसावे विद्या मंदिर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

३ जुलै रोजी   या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शूज,  पीटी युनिफॉर्म , वह्या आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले, तसेच त्यांना वार्षिक शैक्षणिक फी सुद्धा मदत म्हणून दिली गेली.  नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आत्मविश्वासाने व्हावी, यासाठी ही मदत देण्यात आली. या उपक्रमाविषयी बोलताना स्मिता ठाकरे म्हणाल्या,

“शिक्षण ही खरी शक्ती आहे. विद्यार्थ्यांना योग्य सुविधा आणि साधनं मिळाली, तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते पुढे जाऊन समाजासाठी दीपस्तंभ ठरतात. विद्यालयातील मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप समाधान वाटतं. तसेच महिला सशक्तीकरणासाठी लहान मुलींना दर्जेदार शिक्षण आणि सुरक्षित, अनुकूल वातावरण मिळणं फार गरजेचं आहे.”ह्या विद्यार्थ्यांच्या निरागस चेहऱ्यांवरील हास्य कोणत्याही समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीला आनंद देतं. लहान मुलांचा हा निर्मळ आनंद अमूल्य असतो.

आजपर्यंत स्मिता ठाकरे यांनी अनेक शाळांना भेटी देत हा अनुभव सतत घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ती फाउंडेशनने शाळा दत्तक घेणे, शाळांचे नूतनीकरण करणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक व शालोपयोगी साहित्य वाटप करणे असे अनेक उपक्रम सातत्याने आणि यशस्वीपणे राबवले आहेत आणि हे कार्य येणाऱ्या काळातही अखंड सुरू राहणार आहे.

लहान मुलांसोबत वेळ घालवणं, त्यांच्या सोबत वाढदिवस साजरा करणे हे स्मिता ठाकरे यांना विशेष आवडतं. याआधीही त्यांनी अनेक वाढदिवस एचआयव्ही-एड्स बाधित लहान मुलांसोबत साजरे करून त्यांना प्रेम आणि आधार दिला आहे.

मुक्ती फाउंडेशन शिक्षण, आरोग्य, कला आणि महिला सशक्तीकरण अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांत सामाजिक परिवर्तनासाठी झपाटून कार्य करत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.