क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

मतदान करा, नाटकावर ५० टक्के सवलत मिळवा,‘पाहिले न मी तुला’ नाटकाची खास ऑफर

२० नोव्हेंबरला रंगणार रौप्य महोत्सवी प्रयोग

कमी कालावधीत ‘सुमुख चित्र’ आणि ‘अनामिका’ प्रस्तुत ‘पाहिले न मी तुला’ या नाटकाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले असून उत्तम कथानक, दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय व उच्च तांत्रिक मूल्यांमुळे रसिक प्रेक्षकांना या नाटकाने मोहिनी घातली आहे. मतदानाचा दिवस आणि नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग असा योग जुळून आल्याने रौप्य महोत्सवी प्रयोगाच्या निमित्ताने नाट्यरसिकांसाठी एक जबरदस्त ऑफर ‘पाहिले न मी तुला’ या नाटकाने आणली आहे. या नाटकाचा *रौप्य महोत्सवी प्रयोग येत्या २० नोव्हेंबर रोजी शिवाजी मंदिर, दादर दुपारी ४.०० वा. रंगणार आहे* 

मतदान केल्याची खूण तिकीट बारीवर दाखवा आणि तिकिटावर ५०% सवलत मिळवा. तुमचंच वाटेल असं आपलं नाटक असं म्हणत नाटकातील कलाकारांनी मतदानाच्या हक्कासोबत मनोरंजनाचा हक्क ही एन्जॉय करण्याची विनंती केली आहे. ही सवलत फक्त तिकीट बारीवर उपलब्ध असणार आहे. ऑनलाइन नसणार आहे.  

लेखक-दिग्दर्शक सुनिल हरिश्चंद्र यांनी नात्याच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीचा धमाल वेध ‘पाहिले न मी तुला’ या नाटकातून घेतला आहे. रौप्य महोत्सवी नाटकाचा प्रयोग सादर करणे, हा प्रत्येक कलाकारासाठी एक आनंदाचा क्षण असतो. शिवाजी मंदिर येथे होऊ घातलेल्या रौप्य महोत्सवी प्रयोगाचा आनंद घेत मतदानाचा हक्क ही बजवा असे आवाहन या नाटकात प्रमुख भूमिकेत असणाऱ्या अंशुमन विचारे, हेमंत पाटील , सुवेधा देसाई यांनी केले आहे.  

सुमुख चित्र चे कार्यकारी निर्माते निखिल जाधव आहेत. सूत्रधार दिनू पेडणेकर आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून संगीत निनाद म्हैसळकर यांचे आहे. प्रकाशयोजननेची जबाबदारी राजेश शिंदे यांनी सांभाळली आहे. वेशभूषा वरदा सहस्त्रबुद्धे तर रंगभूषा उदयराज तांगडी यांची आहे अरविंद घोसाळकर व प्रसाद सावर्डेकर यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.