क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

‘जिलबी’ आणि ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ अभिनेत्री अश्विनी चवरेचा हॉट अंदाज तिच्या ग्लॅमरस फोटोशूटची सोशल मिडियावर चर्चा..

सध्या साउथचे सिनेमे जगभर गाजताना दिसत आहेत. यामध्ये आता एक मराठमोळ्या चेहरा देखिल सध्या सोशल मिडियावर आपल्या हॉट, बोल्ड लूकमूळे चर्चेत आला आहे. साउथमध्ये आपली छाप टाकलेली मरठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरे आता चर्चेत आली आहे तिच्या एका ग्लॅमरस फोटोशूटमुळे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अश्विनीने एका हॉट आणि सेन्सेशनल फोटोशूटमधून स्वतःचा असा एक वेगळा लूक प्रेक्षकांसमोर सादर केला आहे, जो यापूर्वी कधीही पाहिला गेला नव्हता. २०२५च्या पहिल्याच महिन्यात अश्विनीचा हा नवा लूक चाहत्यांसाठी एक सरप्राईज ठरला आहे.

तिच्या या बोल्ड लूकने तिचे चाहते थक्क झाले आहेत सोशल मीडियावर तिच्या या फोटोशूटचे फोटो व्हायरल होत आहेत आणि तिच्या या धाडसी निर्णयाचं जोरदार कौतुक केलं जात आहे. नवीन वर्षाची सुरुवात ग्लॅमरस फोटोशूटने झाल्यावर, अश्विनी याच वर्षात मराठी आणि साऊथचं दमदार कोलॅबोरेशन ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ आणि ‘जिलबी’ या सिनेमांत झळकणार आहे. हे दोन्ही सिनेमे याच वर्षी प्रदर्शित होणार आहेत. अश्विनी चवरेने या फोटोशूटसाठी एक आधुनिक आणि आकर्षक स्टाइल निवडली असून, तिच्या लूकमध्ये आत्मविश्वास, ग्लॅमर, आणि एक हटके व्यक्तिमत्व झळकत आहे. हे फोटो तिच्या चाहत्यांना तिच्या व्यक्तिमत्वाचा नवीन पैलू दाखवतात, जो आतापर्यंत फार कमी लोकांनी पाहिला होता. अश्विनीच्या या बोल्ड फोटोशूटमुळे तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

तिच्या चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील खास मित्र परिवाराने तिच्या या नवीन फोटोशूटसाठी दाखवलेल्या आत्मविश्वासाचे कौतुक केले आहे. अश्विनीच्या या फोटोशूटमुळे २०२५ मध्ये ती मराठी इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री ठरणार यात काही शंका नाही. विशेष म्हणजे अश्विनी चावरेचा हा नवा अवतार तिला २०२५ मधील मराठी इंडस्ट्रीचा हॉट आणि सेन्सेशनल चेहरा बनवणार हे नक्की.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.