एमएफए इलाईट डिव्हिजनमध्ये रुद्र एफसी संघाला उपविजेतेपद
आयडब्लूएल 2च्या दिशेने रुद्र एफसीची आगेकूच
मुंबई, १९ नोव्हेंबर २०२४: एमएफए(मुंबई फुटबॉल असोसिएशन) महिला इलाईट डिव्हिजनमध्ये रुद्र एफसी संघाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर उपविजेतेपद संपादन केले. या कामगिरीमुळे रुद्र एफसी संघाने डब्लूआयएफए(वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन)च्या महिला लीगमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर इंडियन वूमन्स लीग(आयडब्लूएल)2च्या दिशेनेदेखील आगेकूच केली आहे.
कॅप्री स्पोर्ट्स यांचा पाठिंबा असलेल्या रुद्र एफसी संघाने या लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. रुद्र एफसी संघाने ११सामन्यात सात विजय व दोन बरोबरी व २३ गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. या स्पर्धेत क्लबने प्रतिस्पर्धीकडून ११ गोल स्वीकारताना २७ गोल नोंदवून मैदानात आपले वर्चस्व कायम राखले.
डब्ल्यूआयएफएच्या साखळी स्पर्धेत रुद्र एफसी संघाला महाराष्ट्राच्या काही सर्वोत्तम संघांचे आव्हान सहन करावे लागेल. यंदाच्या मोसमात हर्षदा काळभोरने सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, तर समृद्धी काटकोळेने सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक हा पुरस्कार पटकावला. रुद्र एफसीचे विजेतेपदाचे लक्ष्य असले, तरी त्यासाठी त्यांना देशाच्या प्रमुख महिला फुटबॉल लीगमध्ये पहिल्या दोन क्रमांकांवर यावे लागेल. रुद्र एफसी एक समतोल संघ असून या स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीमुळे आगामी स्पर्धेत ते आत्मविश्वासाने सामना करतील.
कॅप्री स्पोर्ट्सच्या संचालिका जीनिशा शर्मा म्हणाल्या की, रुद्र स्पोर्ट्सची कामगिरी ही भारतातील महिला फुटबॉलपटूमध्ये असलेली प्रचंड क्षमता अधोरेखित करते. कॅप्री स्पोर्टसमध्ये आणिही फुटबॉलमधील महिला खेळाडूंसाठी एक शाश्वत मार्ग तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत. ही फक्त सुरुवात आहे. आम्ही महिला प्रतिभेचे संगोपन करण्यासाठी, त्यांना संधी निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्याबरोबरीने खेळाचे भवितव्य उज्ज्वल घडविण्यासाठी उत्सुक आहोत.
क्लबने मैदानावर आणि बाहेरही दोन्ही प्रकारे चांगली कामगिरी केली आहे. भारतातील द्वितीय श्रेणीतील महिला फुटबॉल लीगमध्ये पदोन्नती मिळविणे हा क्लबसाठी महत्वाचा टप्पा असेल.
संघातील खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे:
सोनाली साळवी, हर्षदा काळभोर, अनुष्का पवार, साक्षी घुसाळकर, प्रिया सुखदेवे, निशा पाटील, पूनम मिठारी, समृद्धी काटकोळे, सानिका पाटील, रितिका सिंग, स्नेहल कांबळे, शर्वरी डोणकर, शिवानी पाटील, श्वेता झा, सिमरन नवलेकर, आरती काटकर, सीमा छत्रपाल, प्रीती सुरेश, लिहाओरुंगबम सनाथोई देवी, अरुबम निलम चानू, सेरा पिमेंटा, शर्लिन कार्दोज, वेदा गांडले, कोमल डफळे, अंजली बारके.