स्टार प्रवाहच्या लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत रंगणार सासू-सून मंगळागौर स्पर्धा
सुप्रसिद्ध अभिनेते आणि सूत्रसंचालक आदेश बांदेकर करणार परीक्षण
श्रावण महिना म्हण्टलं की आपसुकच चाहूल लागते ती सणांची. सणांचा गोडवा वाढवणाऱ्या या महिन्यात तमाम महिला वर्गाला उत्सुकता असते ती मंगळागौरी सणाची. मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांमध्येही सणांचा जल्लोष अनुभवायला मिळतो. लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत लवकरच मंगळागौर स्पर्धेची लगबग पाहायला मिळणार आहे. मंगळागौरी स्पर्धेचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते आणि सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांची उपस्थिती. कोल्हापुरातील सर्वात मोठ्या मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन आदेश बांदेकर करणार आहेत. या स्पर्धेत सासू आणि सुनेला जोडीने सहभागी व्हायचं आहे. पारंपरिक खेळ खेळून ही स्पर्धा जिंकणाऱ्या विजेत्या जोडीला सोन्याचं पैंजण आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
मंगळागौरीच्या या स्पर्धेत कला आणि सरोज सोबत नयना- रोहिणी, रजनी आणि अनामिका देखिल सहभागी होणार आहेत. सासू-सुनेची ही जोडी स्पर्धेत काय कमाल दाखवते हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. मंगळागौरी स्पर्धेतले अवघड टप्पे पार करत कोणती जोडी विजयी ठरणार हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. तेव्हा पाहायला विसरु नका लक्ष्मीच्या पाऊलांनी रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.