ताज्या घडामोडी

तेजश्री प्रधान आणि शिवानी सोनारने व्यक्त केला गणपती आगमनाचा उत्साह !

वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेतील स्वानंदी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान* हिने ह्यावर्षीचा गणेशोत्सव कसा आणि कुठे साजरा करणार याबद्दल सांगितले आमच्या घरचा गणपती हा फिरता असतो, या वर्षी माझ्या सख्या काकाच्या घरी म्हणजे गोरेगावला गणपती आहे आणि आम्ही सर्व तिकडे गणेशोत्सव साजरा करणार आहोत. म्हणजे मला लक्षात आहे कि माझा जन्म झाल्यापासून गणपती स्थापना प्रधानांच्या घरी होत असताना पहिली आहे. गणपती उत्सवात मला सर्वात जास्त मोदक आवडतात, डायट असो काही असो मोदक खाण टाळणं खूप अवघड आहे. मोदक आणि माझी वीण खूप घट्ट आहे.त्यामुळे मी उपाशी राहीन पण मोदक नक्की खाईन. गणेशोत्सवाच्या लहानपणीच्या खास आठवणी आहेत जिथे मी सोसायटी कार्यक्रमात सहभागी होऊन माझ्या कला सादर केल्या आहेत आणि बहुतेक बाप्पा त्याच्या समोर सादर केलेली ती कला त्यांच्याच आशिर्वादाने मला आज इथवर घेऊन आली आहे.

‘तारिणी’ मालिकेतील तारिणी म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनार* आपलं शूट संपवून पुण्याला पोहचली आहे. लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव साजरा करायला. शिवानीने आपल्या उत्साह व्यक्त करताना सांगितले- “३६५ दिवसांपैकी गणपती उत्सवाचे जे १० दिवस असतात ते माझ्यासाठी खूप खास असतात. या वर्षीचा गणेशोत्सव माझ्यासाठी खास आहे, कारण लग्नानंतरचा माझा हा पहिला गणेशोत्सव आहे. माझ्या माहेरी १० दिवसांचा गणपती असतो, पण माझ्या सासरी इतके वर्ष दीड दिवसाचा गणपती असायचा पण या वर्षांपासून माझ्या सासूबाईंनी ठरवले आहे कि आपण ५ दिवसांचा गणपती ठेवायचा. माहेरी आणि सासरी दोन्हींकडे गणपती असणार आहे तर तारांबळ उडणार आहे. पण बाप्पाच्या आशिर्वादाने कधी काम थांबलं नाही. मी दरवर्षी मानाच्या ५ गणपतीचे दर्शन घेतेच. मला बाप्पाची आरास करायला प्रचंड आवडते. गणेशोत्सवात जे वातावरण असतं ते खूप छान वाटत.”

तेव्हा बघायला विसरू नका ‘वीण दोघातली ही तुटेना’ सोम- शनि संध्या ७:३० वा. आणि ‘तारिणी’ सोम- शुक्र ९:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.