“माझे वडील आणि आजोबा पोलीस खात्यात असल्यामुळे माझ्यावर ते संस्कार आहेत…” शिवानी सोनार
देश प्रेम दाखवायची पद्धत म्हणजे नियमांचे पालन करणे.
‘तारिणी’ मालिका झी मराठी वर प्रसारित झाली आहे आणि पहिल्या प्रोमो पासूनच या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. मालिकेचा विषय खूप खास आहे, तारिणीचं आपल्या माणसांवर आणि देशावर प्रचंड प्रेम करते आणि जेव्हा त्यांच्यावर संकट येत तेव्हा ती त्यांचं रक्षण करण्यासाठी खंबीर उभी राहते. तारिणी म्हणजेच *अभिनेत्री शिवानी सोनार* ने स्वातंत्र्य दिनाच्या निम्मिताने आपलं देश प्रेम व्यक्त करताना सांगितले. “सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, मी तारिणीची भूमिका साकारत आहे जी एक अंडरकव्हर कॉप आहे आणि ही भूमिका साकारताना खूप अभिमान वाटतोय. या मालिकेतू प्रेक्षकांना इमोशन्स पासून ऍक्शन पर्यंत सर्व पाहायला मिळणार आहे. तारिणीसाठी जितकं देश प्रेम महत्वाच आहे तितकच ते शिवानीसाठी ही आहे. तारिणी कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या माणसांवर आणि आपल्या देशावर प्रेमकरणारी आहे. तिच्यासाठी शिस्त आणि नियम पाळण खूप महत्वाचं आहे. मी माझ्या खासगी आयुष्यात देखील देशाचे नियम पाळण्याचा पाळायचा संपूर्ण प्रयत्न करते कारण माझे वडील पोलीस खात्यात आहेत आणि आजोबा देखील पोलीस खात्यात होते त्यामुळे ते संस्कार माझ्यावर आहेत. म्हणूनच मला वाटत कि तारिणी आणि शिवानी मध्ये देश प्रेम हे साम्य आहे आणि ते दाखवायची पद्धत म्हणजे नियमांचे पालन करणे.”
‘तारिणी’ तुम्हा सर्वाना प्रेरणा देणारी कहाणी आहे तेव्हा बघायला विसरू नका सोम ते शुक्र रात्री ९:३० वा सदैव तुमच्या झी मराठीवर.