ताज्या घडामोडी

वर्ल्ड आयर्न डेफिशिएन्सी दिनाच्या निमित्ताने डॅनोन इंडियाची घोषणा


‘आयर्न अप!’
आयर्न डेफिशिएन्सी असलेल्या ऍनिमिया (IDA) सोबत लढण्यासाठी एक देशव्यापी उपक्रम
स्क्रीनिंग, जागरूकता आणि सामुदायिक उपक्रमांद्वारे लाखो लोकांपर्यंत पोहोचणे

भारत, 26 नोव्हेंबर 2025:
लोह कमतरता आणि ऍनिमियाच्या गंभीर समस्येला भारत तोंड देत असताना वर्ल्ड आयर्न डेफिशिएन्सी दिनाच्या निमित्ताने डॅनोन इंडियाने आज एक व्यापक, देशव्यापी चळवळ – ‘आयर्न अप!’ जाहीर केली. देशभरातली आयर्न डेफिशिएन्सी (आयडीए) शोधण्यासाठी आणि त्यावर उपाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तपासणी, आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सहभाग, डिजिटल शिक्षण आणि सामुदायिक भागीदारी अंतर्गत वेग यावा यासाठी आयर्न अप मोहीम एकत्र आणते.
डॅनोन इंडियाने आधीच अनेक राज्यांमध्ये 8 लाखांहून अधिक मुलांसाठी आयर्न स्क्रीनिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नॉन-इनवेसिव्ह आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जात असलेल्या या स्क्रीनिंगमुळे रुग्णालये, शाळा आणि समाज केंद्रांमधील मुलांमधील धोका लवकर ओळखणे शक्य होते. परिणामी, पालक आणि शिक्षकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी वेळेवर माहिती उपलब्ध होते.
वैद्यकीय मदत अधिक भक्कम व्हावी यासाठी, डॅनोनने आयडीए प्लेज कँपेन सुरू केली आहे, लोकांमध्ये जागरूकता वाढावी, वेळेवर निदान, आणि प्रतिबंधात्मक पोषणाला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या सामूहिक प्रयत्नांचे उद्दिष्ट वैद्यकीय समुदायात एक मजबूत, एकत्रित चळवळ निर्माण करणे हे आहे जेणेकरून कुटुंबांना दररोज आयर्न खाण्याचे महत्त्व समजून घेण्यास तसेच त्यावर कृती करण्यास मदत होईल.
आयर्न अप उपक्रमाचा भाग म्हणून ‘डिसअपिअर्ड रेड’ या डिजिटल मोहिमेद्वारे, सोशल प्लॅटफॉर्मवर 25 दशलक्षाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे डॅनोन इंडियाचे उद्दिष्ट आहे. आयर्नची कमतरता मेंदूच्या कार्यावर कसा परिणाम करते आणि दैनंदिन जीवनातील उत्पादकता कशी कमी होते, हे अधोरेखित करण्यासाठी ही मोहीम काही गोष्टी सांगते. यामुळे वेळेवर तपासणी आणि योग्य पोषण पर्यायांचा सक्रियपणे अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळते.
शाळा आणि सामाजिक केंद्रांमध्ये डॅनोन आयर्न डेफिशिएन्सी जागरूकता शिबिरांचे आयोजन करते आहे, ज्यामध्ये ऍनिमियाचा सर्वाधिक धोका असलेली मुले आणि महिलांवर लक्ष केंद्रित केले जाते. जागरूकता निर्माण करणे, लवकर निदान होण्यास मदत करणे आणि सर्वाधिक गरज असलेल्या समुदायांसाठी पोषण संदर्भातील महत्त्वाची तफावत भरून काढणे हा या प्रत्यक्ष प्रयत्नांचा उद्देश आहे.
दीर्घकालीन आणि शाश्वत बदलांना सक्षम करण्यासाठी ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त गरज आहे, अशा जिल्ह्यांमधील सरकारी संस्था आणि स्वयंसेवी संस्थांसोबत भागीदारी करत डॅनोन ‘ऍनिमिया मुक्त भारत’ सारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांना पाठिंबा देत आहे. अचूक, शास्त्रीयदृष्ट्या पोषणाची माहिती समाजापर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचेल यासाठी हे सहकार्य प्रयत्न करेल. तसेच या माध्यमातून भारताच्या व्यापक सार्वजनिक आरोग्य प्रयत्नांना बळकटी मिळेल.
डॅनोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. शशी रंजन म्हणाले: “देशातील सर्वात मोठ्या पोषणविषयक आव्हानांपैकी एकाला तोंड देऊन लाखो लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आयर्न अप मोहिमेच्या लाँचिंगसह आम्ही वेळेवर तपासणी, अधिक पोषण जागरूकता आणि सरकारच्या ऍनिमिया मुक्त भारत मोहिमेला पाठिंबा देऊन आयर्न डेफिशिएन्सी लवकर कळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यामुळे आजार आढळल्यास वेळेवर उपाय करणे शक्य होईल. साधे पण उत्तम पोषणविषयक पर्याय आरोग्यामध्ये चांगले बदल घडवू शकतात आणि मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण परिणाम घडविण्यासाठी आरोग्यसेवा भागीदारांसोबत काम करण्याचा आम्हाला अभिमान आहे.”
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार (NFHS), भारतात 6 ते 59 महिने वयोगटातील 67% मुले ऍनिमिक आहेत, तर द लॅन्सेटच्या निष्कर्षांसह जागतिक संशोधनात असे दिसले आहे की, भारतीय महिलांमध्ये अपंगत्वाचे एक प्रमुख कारण म्हणजे ऍनिमिया. हे चिंताजनक निष्कर्ष व्यापक आणि सर्वसमावेशक उपक्रमांची तातडीची गरज अधोरेखित करतात. डॅनोन आपल्या आयर्न अप या मोहिमेद्वारे ही जबाबदारी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवते.
देशभरातील समुदायांसाठी निरोगी भविष्य घडवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा डॅनोन इंडिया या उपक्रमाच्या माध्यमातून पुनरुच्चार करते. तसेच जागरूकतेमुळे वेळेवर कृती होईल आणि वेळेवरील कृती ही दीर्घकालीन बदलात रूपांतरित होईल, याची खात्री करते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.