क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर परत येणार आहे प्रेमाची जादू – ‘बडे अच्छे लगते हैं – नव्या पर्वा’सह!

 

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आपल्या दर्जेदार आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध मालिकांमुळे प्रेक्षकांचा नेहमीच आवडता चॅनेल राहिला आहे. आता पुन्हा एकदा हा चॅनेल प्रेमाची गोडी छोट्या पडद्यावर परत आणण्यासाठी सज्ज आहे – आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि आयकोनिक मालिकेच्या नव्या पर्वासह – ‘बडे अच्छे लगते हैं – नवा सीझन’.

हा नवा सीझन प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्या शुद्ध आणि हळव्या प्रेमाची अनुभूती देणार आहे, जी गेल्या काही काळात टेलिव्हिजनवर कमी भासत होती. या गोष्टीत असे प्रेम दाखवले जाईल जे हृदयाची धडधड वाढवते, जेव्हा एखाद्याला खऱ्या अर्थाने ‘आपला’ वाटणारा व्यक्ती भेटतो. ही कथा असे गोड क्षण, हळुवार भावना आणि प्रेमाच्या पहिल्या स्पर्शाची मिठास पुन्हा अनुभवायला लावेल.

‘बडे अच्छे लगते हैं’ ही मालिका फक्त एक कथा नाही, ती एक भावना आहे, जी अनेक पिढ्यांमध्ये पोहोचली आहे. या फ्रेंचायझीने नेहमीच परिपक्व आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध प्रेमकथा सादर केल्या आहेत, ज्या प्रेक्षकांच्या मनाला भिडल्या आहेत आणि काळाच्या कसोटीवर खरी उतरल्या आहेत.

या नव्या सीझनमध्ये ‘ऋषभ’ची भूमिका साकारत असलेले अभिनेता हर्षद चोपड़ा म्हणाले, “या नव्या सीझनसह प्रेक्षकांना पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर सच्च्या प्रेमाची अनुभूती होईल. हा शो नेहमीच प्रेमाचा उत्सव साजरा करत आला आहे, पण या वेळेस आपण ते हरवलेलं जिवंत आणि हृदयस्पर्शी प्रेम पुन्हा दाखवणार आहोत. आम्ही सर्वजण खूप उत्सुक आहोत हे सीझन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला.”

‘भग्यश्री’ची भूमिका साकारत असलेली शिवांगी जोशी म्हणाली, “मी अत्यंत उत्साहित आहे ‘बडे अच्छे लगते हैं – नवा सीझन’ प्रेक्षकांपुढे सादर करताना. या शोने टेलिव्हिजनवर प्रेमाची व्याख्या बदलली आहे. ही एक अशी नवकोरी झलक असेल प्रेमाची, जी प्रेक्षकांनी बऱ्याच काळापासून अनुभवलेली नाही. ही अशी गोष्ट असेल जिथे केमिस्ट्री आणि ती खास भावना असेल – जेव्हा कोणी तुम्हाला तुमचं ‘परफेक्ट मॅच’ वाटतं. या आयकोनिक शोचा भाग होणं ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आणि आनंद आहे, आणि मी आशा करते की प्रेक्षकांना हा नवा पर्व सुद्धा तेवढाच प्रिय वाटेल.”

‘बडे अच्छे लगते हैं – नवा सीझन’ ची सुरुवात होत आहे. १६ जूनपासून, प्रत्येक सोमवार ते शुक्रवार, रात्री ८:३० वाजता, फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि SonyLIV वर.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.