क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी
२६/११ ला शहीद झालेल्या जवान आणि पोलिसांना अभिनेत्री मेघा धाडे ने दिली मानवंदना

मुंबई : २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी व पोलीस यांना मानवंदना आणि दहशतवादी हल्ल्यात जखमी पोलिस व जवानांचा सन्मान म्हणून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहून अभिनेत्री मेघा धाडे यांनी जवानांना आदरांजली दिली.
या कार्यक्रमासाठी अभिनेत्री मेघा धाडे, भाजप नेते श्री. देवेंद्र फडणवीस, श्री राहुल नार्वेकर, श्री अतुल सावेसर, अभिनेता जॅकी भगनानी तसेच इतर मान्यवरांनी शहीद पोलीस आणि जवानांना मानवंदना दिली व दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या जवान आणि पोलिसांचा सन्मान केला.