क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

महान गायक किशोर कुमार यांच्या खंडवा शहरातून आला आहे सितारे जमीन पर मधील सुनील गुप्ता उर्फ आशीष पेंढसे

‘तारे जमीन पर’ या २००७ मध्ये आलेल्या हृदयस्पर्शी चित्रपटाच्या आध्यात्मिक सिक्वेल ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. या चित्रपटात हास्य, प्रेम आणि प्रेरणादायी गोष्टींचा सुंदर मिलाफ पाहायला मिळणार आहे. आता निर्मात्यांनी आणखी एका खास पात्राची ओळख करून दिली आहे — तो म्हणजे आशीष पेंढसे उर्फ सुनील गुप्ता.

मध्य प्रदेशातील खंडवा या प्रसिद्ध शहरातले जिथून महान गायक किशोर कुमार देखील होते. आशीष पेंढसे आता आपल्या पहिल्याच चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात ते अभिनेता आमिर खानसोबत झळकणार असून त्यांची व्यक्तिरेखा आहे सुनील गुप्ता नावाचा एक प्रसन्नचित्त, आत्मविश्वासू सुरक्षा रक्षक, जो आयुष्यातल्या प्रत्येक आव्हानाला हसत-खेळत सामोरा जातो. फिल्ममध्ये आशीषसह आणखी नऊ नवोदित कलाकार आपल्या अभिनयाचा झळाळता ठसा उमटवणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘शुभ मंगल सावधान’ सारख्या ट्रेंड-ब्रेकींग ब्लॉकबस्टर देणारे आर. एस. प्रसन्ना यांनी केले आहे. आता ते आमिर खान प्रोडक्शन्ससोबत या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये परतले आहेत.

चित्रपटात आमिर खान आणि जेनेलिया देशमुख प्रमुख भूमिकेत झळकणार असून, याचे गाणे अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून, संगीत शंकर-एहसान-लॉय यांचं आहे. पटकथा दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे निर्माते आहेत आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवि भागचंदका.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.