सिने पत्रकार बाबा लोंढे यांना राज्यस्तरीय दर्पनकार पुरस्कार

नाशिक येथील अशोका व्हर्चुएल हॉल , इंजिनियर्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया , उंट रोड नाशिक येथे* *राज्यस्तरीय दर्पनकार पुरस्कार जो बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी मराठी पत्रकार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात* *पत्रकारांच्या वतीने मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला आखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडीया फौंडेशन ने महाराष्ट्रातील विविध वर्तमान पत्र आणि ईलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा आकर्षक ट्रॉफी ,सन्मान पत्र , पुष्पगुच्छ आणि रुबाबदार फेटा देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यामध्ये मुंबईतील सिने पत्रकार श्री बाबा लोंढे यांचाहि पुरस्कार , सन्मानपत्र , फेटा व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
बाबा लोंढे हे एक हसमुख व बोलके व्यक्तिमत्व जवळ जवळ 30 वर्ष फोटो* *जर्नालिस्ट म्हणून बॉलिवूड मध्ये कार्यरत .* *अनेक नायक नायिकांचे फोटोशूट , इंटरवह्यु , शूटिंग रिपोर्ट चित्रपट संबंधी बातम्या , बर्थडे पार्टी , म्युझिक ,ट्रेलर , पोस्टर लॉन्च व गॉसिप अशा अनेक प्रकारच्या* *बातम्या फोटो सहित अनेक वर्तमान पत्रात , साप्ताहिकात , मासिकात यामी प्रकाशित केल्या आहेत.
सुरुवात प्रादेशिक वर्तमान पत्रातून करून मायापुरि , फिल्मसिटी ,फिल्म फेयार किंग्सस्टार , कुबेर टाइम्स , प्रजावानी , पुढारी ,संचार , सुराज्य , दैनिक भास्कर , जागरण , पंजाब केसरी , व्रत्तमानस , पुण्य नागरी , लोकमत , लोकसत्ता , महाराष्ट्र टाइम्स , मिड डे ,बॉम्बे टाइम्स , डी एन ए , एमएच 09 यू ट्यूब चॅनेल , तरुणमित्र ,मुंबई संध्या ,सान्झ समाचार इंडियन रीडर ,महासत्ता अशा अनेक दैनिक , पाक्षिक व मासिकात काम केले आहे .*हे करत असताना अनेक मान सन्मान व पुरस्कारही मिळाले आहेत.
आखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फौंडेशन च्या वतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष श्री विलास पाटील , राष्ट्रीय महासचिव श्री सुनील मगर व राष्ट्रीय संघटक श्री सुनील निकम यांच्यासह श्रीमती आरमा बेगम , ज्योती रामोळे यांनी अथक परिश्रम घेतले