ताज्या घडामोडी

‘मॅजिक’ चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत

"मॅजिक" एक दरवळणारं मायाजाल १ जानेवारीला चित्रपटगृहात

रवींद्र विजया करमरकर दिग्दर्शित सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट “मॅजिक” १ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

आजवर अनेक भूमिकांतून आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर आता अभिनेता जितेंद्र जोशी नव्या वर्षात ‘मॅजिक’ करणार आहे. मॅजिक या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटात जितेंद्र जोशी एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत असून, १ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.

तुतरी व्हेेंचर्स या निर्मिती संस्थेच्या राजू सत्यम यांनी “मॅजिक” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘आई कुठे काय करते’सारख्या उत्तमोत्तम मालिकांचं दिग्दर्शन केलेल्या रवींद्र विजया करमरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. योगेश विनायक जोशी, रवींद्र विजया करमरकर यांनी कथालेखन, तर योगेश विनायक जोशी, अभिषेक देशमुख यांनी पटकथा लेखन केलं आहे. केदार फडके यांनी छायांकन तर मंदार चोळकर वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना देवेंद्र भोमे, चिनार-महेश यांनी संगीत दिले आहे. दिनेश पुजारी, नयनेश डिंगणकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात जितेंद्र जोशी, सिद्धीरुपा करमरकर, जुई भागवत, प्रियांका पालकर, मयूर खांडगे, अभिजित झुंजारराव, रुपा मांगले, नितीन भजन, गुरुराज कुलकर्णी, योगेश केळकर, प्रदीप डोईफोडे, रसिकराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट अनेक महोत्सवांमध्ये गौरवला गेला आहे.

“मॅजिक” या चित्रपटात अरूण राऊत या एन्काऊंटर स्पेशलिस्ट असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची गोष्ट उलगडण्यात आली आहे. सायकोलॉजिकल थ्रिलर असलेल्या या “मॅजिक” चित्रपटाची गोष्ट नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. आजवर अनके फेस्टिवलमध्ये या चित्रपटाने आपली वेगळी मोहोर उमटवली असून उत्तम स्टारकास्ट, रंजक कथानक असलेला “मॅजिक” चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी १ जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Thank you

Darshan S.Musale
(Media Planet)

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.