क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

अभिनेत्री गिरीजा प्रभूने स्वीकारलं नवं आव्हान

कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेतल्या एका सीनसाठी गिरीजा उतरली चिखलात

स्टार प्रवाहच्या कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. ल़ॉन्चच्या पहिल्याच आठवड्यात ६.७ टीआरपी मिळवत मालिकेची धमाकेदार सुरुवात झालीय. लवकरच मालिकेत एक रोमांचक वळण पाहायला मिळणार आहे. कावेरी आणि उदयच्या अपघातानंतर चिमुकल्या चिकूला घेऊन कावेरी धर्माधिकारींच्या घरी येते. मात्र सुलक्षणा तिचा स्वीकार करत नाही. घरात स्थान हवं असेल तर मंदिराजवळ असलेल्या तलावातून कमळ आणण्यासाठी तिला सांगण्यात येतं. त्या तलावात उतरणं म्हणजे साक्षात मृत्यूला कवटाळण्यासमान आहे. मात्र कावेरी हे आव्हान स्वीकारते आणि तलावत उतरते. कावेरीचा जीव वाचणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून कळेल.

अभिनेत्री गिरीजा प्रभूसाठी हा सीन साकारणं आव्हानात्मक होतं. साडी नेसून तलावात उतरणं म्हणजे तारेवरची कसरत. बॉडी डबल न वापरता गिरीजाने हा सीन पूर्ण केला आहे. कुडाळ येथील वालावल मंदिराजवळच्या तलावात हा सीन शूट करण्यात आला आहे. दलदल आणि कमळांचं पसरलेलं जाळं यामध्ये शूट करणं जोखमीचं होतं. मात्र मालिकेच्या संपूर्ण टीमच्या मदतीने गिरीजाने यशस्वीरित्या हा सीन पूर्ण केला. जवळपास तीन तास या सीनचं शूट सुरु होतं. संपूर्ण टीमच्या मेहनतीचं हे फळ आहे असं अभिनेत्री गिरीजा म्हणाली. तेव्हा पाहायला विसरु नका कोण होतीस तू, काय झालीस तू रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.