क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

पब्लिक डिमांडवरून विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या आगामी चित्रपटाचं नाव बदललं – ‘द दिल्ली फाइल्स’ ऐवजी आता होईल ‘द बंगाल फाइल्स: राइट टू लाइफ’

https://www.instagram.com/p/DKtWZ3UodD4/?igsh=eGU5Y3NnOTk4YmU0

विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या बहुचर्चित “फाइल्स” त्रयीतील तिसऱ्या चित्रपटाचं नाव आता पब्लिक डिमांडवरून बदलण्यात आलं आहे. पूर्वी या चित्रपटाचं नाव ‘द दिल्ली फाइल्स: द बंगाल चैप्टर’ होतं, मात्र आता हे नाव बदलून ‘द बंगाल फाइल्स: राइट टू लाइफ’ करण्यात आलं आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल, पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांनी प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन हे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

“फाइल्स” त्रयीचा तिसरा भाग:

द ताशकंद फाइल्स’ (२०१९) आणि ‘द कश्मीर फाइल्स’ (२०२२) नंतर आता ‘द बंगाल फाइल्स: राइट टू लाइफ’ ही चित्रपटमालिकेतील तिसरी आणि महत्त्वाची कडी ठरणार आहे. हा चित्रपट विशेषतः १९४० च्या दशकात भारताच्या फाळणीपूर्व काळात बंगालमध्ये घडलेल्या भीषण सांप्रदायिक दंगलींवर आधारित आहे – विशेषतः डायरेक्ट अ‍ॅक्शन डे आणि नोआखाली दंगलींवर.

विवेक अग्निहोत्री यांनी या घटनांना “हिंदूंचा नरसंहार” असे संबोधले असून, भारतीय इतिहासातील या दुर्लक्षित व वेदनादायक घटनांना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे.

तगडे कलाकार, प्रभावी कथानक:

या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार हे नावाजलेले कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. टीझरमध्ये मिथुन चक्रवर्ती यांचा पहिला लूक अत्यंत प्रभावी होता – एका सुनसान कॉरिडॉरमध्ये ते थकलेले, पांढऱ्या दाढीत, जळालेल्या जिभेने संविधानाची प्रस्तावना वाचताना दिसतात.

शूटिंग आणि आव्हाने:

या चित्रपटाचं चित्रीकरण सुरक्षेच्या कारणास्तव कोलकाताच्या ऐवजी मुंबईत करण्यात आलं. अनेक अडचणींवर मात करत, विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या टीमने हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला आहे.

निर्मिती आणि सादरीकरण:

‘द बंगाल फाइल्स: राइट टू लाइफ’ चित्रपट विवेक रंजन अग्निहोत्री यांनी लिहिला आहे आणि याचे निर्माता आहेत – अभिषेक अग्रवाल, पल्लवी जोशी आहेत. चित्रपटाचं सादरीकरण तेज नारायण अग्रवाल आणि I Am Buddha Productions यांनी केलं आहे.

हा चित्रपट केवळ इतिहासाचं दर्शन घडवणारा नसून, तो भारतीय जनतेला त्यांच्या हक्कांविषयी आणि अस्तित्वाच्या लढ्यांविषयी विचार करायला भाग पाडणारा ठरणार आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.