‘सुपर डान्सर चॅप्टर-5’ मध्ये सेंसेशनल सोमांशने दाखवली चमक, आईच्या भक्कम पाठिंब्यामुळे स्वप्न साकार!
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील ‘सुपर डान्सर चॅप्टर 5’ हे लहान वयातील उत्तम डान्सर्स साठीचे केवळ व्यासपीठ नाही तर त्यांच्या स्वप्नांना पंख देख देणाऱ्या आईच्या अथक पाठिंब्याचा तो एक उत्सव आहे. ही प्रतिभावंत मुले सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवत आहेत. त्यांच्या डान्सचे व्हिडिओ लाखो वेळा पाहिले जात आहेत आणि त्यांच्यावर कॉमेंट्सचा पाऊस पडत आहे. यातून हेच सिद्ध होते की, मन जिंकण्यासाठी वयाची अट नसते. उत्तराखंड राज्यातील रामनगर येथील सेंसेशनल सोमांश डांगवालसाठी तर भारतातल्या सर्वात मोठ्या डान्स स्टेजपर्यंतचा प्रवास केवळ त्याच्या आईच्या धाडसामुळे आणि अखंड प्रेमामुळे शक्य झाला आहे.
सोमांशची आई, त्याचा सर्वात मोठा आधारस्तंभ असलेली कांचन डांगवाल म्हणाल्या, “मला घराबाहेर पडायलाही खूप संकोच वाटत होता. मी उत्तराखंडमधील रामनगरसारख्या लहानश्या गावातून आले आहे. तिथे सूर्यास्तानंतर घराबाहेर पडायचीही भीती वाटते. पण मुलाच्या स्वप्नांसाठी या सर्व भीतींवर मात केली. माझे गाव सोडले आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरात आले. मुलासाठी एक आई कोणत्याही थराला जाऊ शकते आणि आज मला खूप अभिमान आहे की, सोमांश ‘सुपर डान्सर चॅप्टर-5’ सारख्या सर्वात मोठ्या डान्स स्टेजवर दिसणार आहे. त्याच्या कौशल्यावर मला विश्वास आहे. त्याच्या प्रवासात मी नेहमी त्याला साथ देईन.”
कृतज्ञतेने भारावलेला सोमांश म्हणाला, “माझी आई नेहमी माझ्यासोबत असते, हे माझे भाग्य आहे. मला माहिती आहे, घर सोडून नवीन शहरात येणे तिच्यासाठी सोपे नव्हते. पण माझ्यासाठी ती हे सगळं करत आहे. तिच्या या प्रेमामुळेच दररोज सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्याची आणि तिला अभिमान वाटावा, असे काही करण्याची मला प्रेरणा मिळते.”
आई आणि मुलाच्या या कहाणीतून एक हृदयस्पर्शी गोष्ट चित्रीत होते. ती म्हणजे प्रत्येक लहान मुलाच्या प्रतिभेमागे, एक मूक नायक असतो- एक आई असते, जी त्याच्यासोबत स्वप्न पाहण्याचे धाडस करते.
पहा सुपर डान्सर चॅप्टर-5.. 19 जुलैपासून, दर शनिवार-रविवार रात्री 8 वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनीलिव वर..