ताज्या घडामोडी

स्टार प्रवाहच्या शिट्टी वाजली रे च्या महाअंतिम सोहळ्यात डॉ. निलेश साबळेंची खास हजेरी

अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधवसोबत निलेश साबळे करणार धमाल

स्टार प्रवाहचा लोकप्रिय कार्यक्रम शिट्टी वाजली रे चा महाअंतिम सोहळा २ आणि ३ ऑगस्टला जल्लोषात रंगणार आहे. महाअंतिम सोहळ्यात सेलिब्रिटी जोड्यांची धमाल अनुभवता येईलच पण खास आकर्षण ठरणार आहे ते निलेश साबळे आणि सिद्धार्थ जाधवची हजेरी. सिद्धार्थ जाधवचा आता होऊ दे धिंगाणा कार्यक्रम चौपट मनोरंजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तर निलेश साबळे शिट्टी वाजली रे च्या संपूर्ण टीमचं कौतुक करण्यासाठी आणि खास पदार्थांची चव चाखण्याकरिता महाअंतिम सोहळ्यात हजेरी लावणार आहे.

स्टार प्रवाहसोबतचा हा पहिला कार्यक्रम असल्यामुळे निलेश साबळेही प्रचंड उत्सुक आहे. शिट्टी वाजली रे च्या मंचावरच्या या अनुभवाविषयी सांगताना निलेश साबळे म्हणाला, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबतचा हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे. स्टार प्रवाहचे अनेक कार्यक्रम मी पहात आलोय. आता होऊ दे धिंगाणा आणि शिट्टी वाजली रे हे दोन्ही कार्यक्रम माझ्या आवडीचे आहेत. स्टार प्रवाहने इतक्या आपुलकीने आणि प्रेमाने जेव्हा या कार्यक्रमासाठी विचारलं तेव्हा नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं. शिट्टी वाजली रे च्या मंचावरचा दिवस माझ्यासाठी अतिशय गंमतीदार ठरला. मला स्वयंपाक बनवता येत नाही पण माझ्यासोबत अभिनेत्री सुपर्णा श्याम होती. त्यामुळे तिच्या साथीने मी पदार्थ बनवू शकलो. स्टार प्रवाहच्या कुटुंबात माझा प्रवेश झालाय त्यामुळे अतिशय आनंद होतोय.’ 

  तेव्हा पाहायला विसरु नका शिट्टी वाजली रे चा महाअंतिम सोहळा २ आणि ३ ऑगस्टला रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.