ताज्या घडामोडी

“वीण दोघातलीही तुटेना” जेव्हा जबाबदाऱ्यांतून उमलतं एक अनोखं प्रेम…

प्रेम, समजूत आणि जिव्हाळ्याची वीण…लवकरच आपल्या झी मराठीवर!

मराठी टेलिव्हिजनच्या दोन सर्वात लाडक्या आणि प्रतिभावान कलाकारांची जोडी, सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर एकत्र येत आहेत ते ही तुमच्या लाडक्या *झी मराठी* वर. या जोडीची पहिली झलक समोर येताच सर्वांच्या मनात हुरहूर जागी झाली. मालिकेच्या प्रोमोला मिळालेलं भरभरून प्रेम सांगत आहे कि, ही गोष्ट हृदयाशी असणार आहे. सोशल मीडियावर चाहते आपल्या भावना उघडपणे व्यक्त करत आहेत, आणि या दोघांना दररोज आपल्या टीव्ही स्क्रीनवर एकत्र पाहण्यासाठी आता प्रेक्षक वाट पाहत आहेत. *”वीण दोघातली ही तुटेना”* या नव्या मालिकेने पहिल्याच क्षणात साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावरून प्रचंड प्रेम आणि कौतुक मिळालं असून, या शीर्षकाने एक वेगळं आकर्षण निर्माण केलं आहे.

मालिकेत तेजश्री प्रधान साकारतेय स्वानंदी सरपोतदार* ची भूमिका, जबाबदारीने आयुष्य जगणारी, प्रेम आणि लग्न या गोष्टी कायमच मागे टाकून कुटुंबासाठी झटणारी ३५ वर्षीय स्त्री. तर *सुबोध भावे साकारतोय समर राजवाडे* , एक यशस्वी व्यावसायिक आणि मनाने भावनिक माणूस, जो आपल्या भावंडांना आईवडिलांप्रमाणे प्रेम करतो आणि वाढवतोय. या दोन्ही पात्रांची परिस्थिती भिन्न असूनही कुटुंबासाठी निर्माण झालेलं नातं नंतर प्रेमात कसं रूपांतरित होतं, हे पाहणं हीच या मालिकेची खरी गोडी आहे.

पुष्पगंधा प्रोडक्शन प्रस्तुत या मालिकेचं *दिग्दर्शन करत आहेत चंद्रकांत गायकवाड, तर लेखनाची जबाबदारी मधुगंधा कुलकर्णी आणि मुग्धा गोडबोले* या सांभाळत आहेत. कथेत स्वानंदी आणि समर, आपल्या जबाबदाऱ्यांत इतके गुंतले आहेत की त्यांचं वैयक्तिक आयुष्य मागे पढते. पण नियती त्यांना एका वळणावर एकत्र आणते. आपल्या भावंडांनासाठी समर-स्वानंदीच्या आयुष्यात प्रवेश करतो. जी गोष्ट तडजोड म्हणून सुरू होते, ती हळूहळू समजुतीच्या आणि जिव्हाळ्याच्या वीणीत गुंफली जाते.

वीण दोघातली ही तुटेना ही मालिका प्रेक्षकांना केवळ एक नवी कथा नाही, तर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात खोलवर असलेल्या नात्यांची ओल पुन्हा जागवणार आहे. कधी स्वतःला मागे ठेवत जगलेली माणसं जेव्हा एकमेकांच्या सहवासात नव्याने खुलतात, तेव्हा त्यांच्या आयुष्याची वीण अधिक सुंदर बनते. ही वीण अनुभवण्यासाठी, त्यांच्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी, सज्ज व्हा…

वीण दोघातली ही तुटेना’, ११ ऑगस्टपासून दररोज संध्या. ७.३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.*

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.