ऑगस्ट महिन्यात सणांची चाहूल लागणार, अल्ट्रा झकासवर दर शुक्रवारी नव-नवीन कंटेंटचा वर्षाव होणार!
मुंबई ३१ जुलै २०२५:‘ऑगस्ट’ महिना म्हणजे पावसाळ्याचा अखेरचा सडा, सणांची चाहूल आणि गणरायाच्या आगमनाची उत्सुकता! अगदी याच जल्लोषात अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवरही सुरू होतोय धमाकेदार कंटेंटचा उत्सव. या महिन्यात प्रत्येक शुक्रवार तुमच्यासाठी येणार आहेत मराठमोळे सुपरहिट सिनेमे, धमाल वेब सिरीज आणि साऊथ, बांग्लामधील ब्लॉकबस्टर हिट्स तेही तुमच्या मायबोली मराठीत. आता गणपतीच्या स्वागताची तयारी करताना तुमचं मनोरंजनही होईल एकदम झकास!
क्लब 52 : दोन मित्रांच्या जुगाराच्या अंधाऱ्या दुनियेतला थरार*
चित्रपटगृहात प्रेक्षकांची मनं जिंकत यशस्वी ठरलेला ब्लॉकबस्टर ‘क्लब 52’ आता अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर १ ऑगस्ट २०२५ ला तुम्हाला पाहता येणार आहे. अमित वाल्मीक कोळी दिग्दर्शित हा मराठी फुल ऑन ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटात दोन जवळचे मित्र यशाच्या झटपट शोधात अंडरग्राउंड जुगाराच्या धोकादायक दुनियेत पाऊल टाकतात. यशाची गाडी सुरुवातीला वेगात धावते, पण लालसेने, विश्वासघाताने आणि जुगाराच्या गूढ वास्तवाने त्यांची मैत्री पोखरायला सुरुवात होते. प्रत्येक निर्णयात त्यांचे नुसते पैसेच नाही, तर चारित्र्य आणि भविष्यही पणाला लागते. एक चुकीचा डाव त्यांचे आयुष्य कायमचं बदलू शकतो, हे अधोरेखित करणारी ही कथा आहे. चित्रपटात भरत ठाकूर, हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, यशश्री वेणुगोपाल आणि नितीन रूपनवर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
अदृश्य चेहरा (आयडेंटिटी) : आठवणींमधून उलगडणाऱ्या खुन्याच्या शोधाची कहाणी*
अदृश्य चेहरा (आयडेंटिटी) हा अखिल पॉल, अनस खान दिग्दर्शित अॅक्शन, क्राइम मल्याळम भाषेतील चित्रपट आहे. टोविनो थॉमस, त्रिशा कृष्णन, विनय राय, अजू वर्गीस आणि मंदिरा बेदी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात एक स्केच आर्टिस्ट आणि एक पोलिस अधिकारी एका क्रूर हत्याकांडामागील अज्ञात खुनीचा चेहरा उलगडण्यासाठी प्रयत्न करत असतात. गुन्ह्याचा एकमेव साक्षीदार आपल्या मनात खोलवर कोरलेल्या चेहऱ्याच्या आठवणीवरून ते खुन्याचा शोध घेतात. तपासाची ही अनोखी पद्धत आणि वेळेच्या विरुद्ध चाललेली शर्यत यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. मानवी मनाच्या स्मरणशक्ती आणि गुन्हेगारीच्या गुंतागुंतीचं प्रभावी चित्रण करणारा हा चित्रपट ८ ऑगस्ट २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर तुमच्या मायबोली मराठीत प्रदर्शित होणार आहे.
कोण होती ती? (वो कौन थी) : पाप, पश्चाताप आणि अज्ञात सावल्यांची कहाणी*
कोण होती ती? (‘वो कौन थी?’) हा दीपक रामसे दिग्दर्शित हिंदी हॉरर चित्रपट आहे. चित्रपटात एका प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे आयुष्य एका रात्रीच्या अपघाताने बदलून जाते, जिथे त्यांच्या हातून एक तरुणी जखमी होते आणि ते घाबरून पळून जातात.अपघातानंतर पळून गेल्यावर त्यांच्याभोवती भीतीदायक घटना घडायला लागतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या चुकांची किंमत मोजावी लागते. असाच मानवी अपराध आणि अज्ञात शक्तींमधील ही थरारक झुंज दाखवणारा ‘वो कौन थी?’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर तुमच्या मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पुनीत तेजवानी, मधु शर्मा आणि एलेना विक्रम कुमार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
सावट मृत्यूचे (मिशन एक्स्ट्रीम) : धडकी भरवणारी कारवाई आणि राष्ट्ररक्षणासाठीचा झगमगता लढा*
सावट मृत्यूचे (मिशन एक्स्ट्रीम) हा फैसल अहमद, सनी सानवार दिग्दर्शित अॅक्शन बांग्ला भाषेतील चित्रपट आहे. आरिफिन शुवू, ओइशी, नबिला, तास्कीन, मिषा आणि सुमित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात, ‘ढाका अटॅक’ नंतर अबिद रहमानला देशावर एका नव्या अदृश्य धोक्याची चाहूल लागते. या नव्या संकटाचा सामना करताना, त्याला केवळ स्फोटकांचा नाही, तर मानसिक दबाव, धोके आणि गुप्त कटांचाही सामना करावा लागतो. उत्कंठावर्धक घडामोडींनी भरलेला आणि राष्ट्रहितासाठी प्राण पणाला लावणाऱ्या योध्यांची प्रेरणादायी कहाणी सांगणारा हा ब्लॉकबस्टर चित्रपट २२ ऑगस्ट २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर मराठीत प्रदर्शित होणार आहे
अखेरची आशा (नो वे आऊट) : संकटात अडकलेला माणूस आणि नियतीचा धक्कादायक खेळ!
अखेरची आशा (नो वे आऊट) हा नितीन देविदास दिग्दर्शित मल्याळम भाषेतील थ्रिलर चित्रपट आहे. रमेश पिशारोडी, धर्मजन बोलगट्टी, बेसिल जोसेफ आणि रवीना नायर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. चित्रपटात ‘डेव्हिड’ या तरुण उद्योजकाची कहाणी मांडण्यात आली आहे. लॉकडाऊनपूर्वी व्यवसायात केलेल्या १ कोटींच्या गुंतवणुकीनंतर आलेल्या महामारीमुळे डेव्हिड मोठ्या आर्थिक अडचणीत सापडतो. निराश आणि थकलेला डेव्हिड शेवटचा निर्णय घेणार असतो, पण तेव्हाच त्याच्या आयुष्यात एक वेगळं वळण येतं. अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ही भावनिक आणि थरारक कथा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जाते. २९ ऑगस्ट २०२५ ला हा सुपरहिट चित्रपट मराठीत अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होत आहे.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “पावसाळ्याचा शेवट आणि सणांची सुरुवात अशा जल्लोषाच्या वातावरणात प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालण्यासाठी आम्ही खास मराठमोळा, दर्जेदार आणि थरारक कंटेंट घेऊन आलो आहोत. शिवाय ‘अल्ट्रा झकास’वर सादर होणाऱ्या प्रत्येक कथेमुळे केवळ करमणूक होणे इतकाच आमचा उद्देश नाही, तर ती कथा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी, त्यांना विचार करायला लावणारी आणि मनात दीर्घकाळ रेंगाळणारी असावी.”
शिवाय अल्ट्रा झकास प्लॅटफॉर्म Android, iOS, टॅब, वेब, Android TV, Fire TV, Jio Store आणि Cloud TV वर सहज उपलब्ध आहे. त्यामुळे प्रेक्षकांना याचा आनंद कधीही, कुठेही घेता येईल.