ताज्या घडामोडी

इंडियन आयडॉल सीझन 16 ची सुरुवात करताना विशाल ददलानीने आपल्याला कुठून प्रेरणा मिळते हे सांगितले

मुंबई, 7 ऑक्टोबर 2025: भारताचा सर्वात लोकप्रिय गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल नवा सीझन घेऊन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच येत आहे. ‘यादों की प्लेलिस्ट: जहां आवाजें आज वाली और गाने आप वाले’ असे सुंदर थीम असलेला हा सीझन गोड आठवणी आणि गीतांची एक लाट घेऊन येणार आहे. आजची प्रतिभा आणि मागच्या काळातील गाणी यांची सांगड घालत हा सीझन भारतीय आवाजाचे सुरेलपण साजरे करणार आहे, ज्या प्रवासात भावना, आठवणी आणि असामान्य प्रतिभा यांची सोबत प्रेक्षकांना लाभेल.

इंडियन आयडॉलचा हा सीझन सुरू होत असताना विशाल ददलानीने आपल्याला संगीत क्षेत्रात येण्यासाठीची प्रेरणा कुठून मिळाली याविषयीची एक हृदयस्पर्शी गोष्ट सांगितली. बालपणीची ही त्याची आठवण त्याच्या आईच्या आवाजाशी निगडीत आहे.

तो म्हणतो, “माझे आयुष्य गीत-संगीताने भरलेले आहे आणि त्यांच्याभोवती माझ्या आठवणी गुंफलेल्या आहेत. मला अगदी पहिले गाणे आठवते, ते माझी आई माझ्यासाठी म्हणत असे ते गाणे आहे. ‘फूलों का तारों का’ हे ते गाणे होते. या गाण्यात ती ‘बहना’ ऐवजी माझे नाव घालायची. माझ्यापुरते सांगायचे तर हे गाणे मला नेहमी तिच्याच आवाजात ऐकायला येते. माझ्या आई-वडिलांच्या संगीत प्रेमातूनच मला प्रेरणा मिळाली आणि मी कळत-नकळत त्या दिशेने चालत राहिलो.”

इंडियन आयडॉलचा नवीन सीझन बघा 18 ऑक्टोबरपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर*

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.