ताज्या घडामोडी

स्टार प्रवाहच्या कोण होतीस तू…काय झालीस तू मालिकेत नवा ट्विस्ट

यशसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या युगची होणार धमाकेदार एण्ट्री

 

स्टार प्रवाहच्या कोण होतीस तू…काय झालीस तू मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. यशचा अपघाती मृत्यू झाल्याचं कळताच कावेरीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. एकीकडे यशला गमावल्याचं दु:ख असताना घरच्यांपासून हे सत्य लवपण्याची धडपड कावेरीला करावी लागतेय. अश्यातच यशसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या युगची मालिकेत एण्ट्री होणार आहे. युग आणि यश एकसारखे दिसत असले तरी दोघांचाही स्वभाव मात्र खूप वेगळा आहे. यश जितका समंजस आणि प्रेमळ होता अगदी त्याच्या उलट युग आहे. युग पूर्णपणे फिल्मी आहे. तो स्ट्रगलिंग ॲक्टर आहे. स्वत:च्याच जगात रमणारा. पैश्यासाठी तो प्रचंड लालसी आहे आणि ते मिळवण्य़ासाठी तो काहीही करु शकतो.

अभिनेता मंदार जाधव एकाच मालिकेत या दुहेरी रुपात दिसणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना मंदार म्हणाला, ‘पहिल्यांदाच अश्या पद्धतीची भूमिका साकारणार आहे. यश या पात्राच्या पूर्णपणे विरोधी असं हे युगचं पात्र असणार आहे. त्याचा लूक, बोलण्याची स्टाईल सगळंच वेगळं आहे. वेगवेगळी पात्र साकारायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. एकाच मालिकेता आता या दुहेरी भूमिका मी साकारणार आहे त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. यश आणि कावेरी या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. मी साकारत असलेली युग ही भूमिका देखिल प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे.

युग आणि कावेरीची मालिकेत नेमकी भेट कशी होते हे पहायचं असेल तर नक्की पाहा कोण होतीस तू…काय झालीस तू रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.