ताज्या घडामोडी

पोलिसाच्या वर्दीत दिसणार सुबोध भावे, ‘कैरी’ चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकेतून गाजवणार मोठा पडदा

’कैरी’ चित्रपटातील सुबोध भावेची लक्षवेधी भूमिका, पोलिसांच्या भूमिकेतून मोठ्या पडद्यावर

पोलिसांची वर्दी सांभाळणं हे अर्थात अभिमानास्पद आहे. आणि हा अभिमान अभिनेता सुबोध भावेलाही जपावा असं नेहमी वाटायचं. बऱ्याच मुलाखतींमध्ये पोलीस व्हायचं स्वप्न होतं असं ते म्हणाले आहेत. आणि त्याचं हे स्वप्न ते अभिनय क्षेत्रात अभिनयाच्या वाटे पूर्ण करत आहेत. हो. आगामी ‘कैरी’ या मराठी चित्रपटात सुबोध भावे पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहेत. पोलिसांच्या भूमिकेत काम करायचं स्वप्न ते या चित्रपटाद्वारे पूर्ण करत आहेत. फॉरेन पोलिसांच्या भूमिकेत ते या चित्रपटात दिसले. याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. ट्रेलरमधील त्यांची ही करारी भूमिका चाहत्यांना चित्रपटातील त्यांच्या भूमिकेची उत्सुकता वाढवत आहे.

‘कैरी’ सिनेमातील भूमिकेबाबत बोलताना सुबोध भावे म्हणाले की, “यंदा हिवाळ्यातच आपणा सर्वांना कैरी चाखायला मिळणार आहे. आणि ही कैरी आंबट-गोड वा नेमकी कशी असणार हे मात्र १२ नोव्हेंबरला कळेल. कारण माझा ‘कैरी’ हा आगामी सिनेमा भेटीस येतोय.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.