ताज्या घडामोडी
लोकेश गुप्ते पुन्हा छोट्या पडद्यावर – प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला!

मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ व प्रेक्षकांचा लाडका अभिनेते लोकेश गुप्ते तब्बल ९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर नवीन मालिकेत पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. अनेक संस्मरणीय मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली असून, पुनरागमनाच्या घोषणेमुळे मराठी टीव्हीक्षेत्रात नक्कीच उत्साह निर्माण होईल. लोकेश यांनी याआधी *”वादळवाट”, “या सुखानो या”, “आभास हा”, “लज्जा”, “जुळून येती रेशीमगाठी”* अशा लोकप्रिय मालिकांत काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत .
