क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेश

पहिल्या वहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेच्या उलटगणतीला सुरुवात

 

६ डिसेंबर २०२४ – पुढील वर्षी १३ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत भारत पहिल्या वहिल्या ऐतिहासिक खो-खो विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनासाठी सज्ज आहे. या ऐतिहासिक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय खो-खो महासंघाच्या सहाकार्याने भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय (म्यास) दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे १० डिसेंबर ते ११ जानेवारी २०२५ पर्यंत सखोल प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार आहे. 

या शिबिरात ६० पुरुष आणि ६० महिलाखेळाडूंसह ६ प्रशिक्षक आणि इतर सहाय्यक कर्मचारी, ६ फिजिओथेरपिस्ट यांचा समावेश असेल. भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू ९ डिसेंबर रजी राष्ट्रीय राजधानीत जमतील आणि या कठोर प्रशिक्षण टप्प्यातील त्यांच्या कामगिरीच्या आधारे विश्वचषक स्पर्धेसाठी अंतिम संघ निवडला जाईल. 

भारतीय खो-खो महासंङाचा असा विश्वास आहे की उत्कृष्टतेपासून विजयमंचापर्यंतच्या परिवर्तनाची गुरुकिल्ली म्हणून खेळाडूची सर्वांगिण कालजी घेण्यात येत आहे. अशा प्रकारे जागतिक दर्जाच्या सुविधा, उच्च तीव्रतेचे प्रशिक्षण सत्र आणि पुनप्राप्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक खेळाडूच्या आवश्यकतेनुसार काळजीपूर्वक आहार तयार करणे, देशातील सर्वोत्तम प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मानसिक मूल्यमापन केले जाणार आहे. 

प्रशिक्षण कार्यक्रम खेळाडूंचे कार्यप्रदर्शन आणि आरोग्य सुधारण्यासाठी अत्याधुनिक क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान देखिल महत्वाचे ठरते.

शरीर रचना विश्लेषक –

हे खेळाडूंना शरीराची रचना, स्नायु वस्तुमा, व्हिसेरल फॅट आणि हायड्रेशनवर अचूक माहिती देते. ही माहिती प्रशिक्षकांना प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रत्येक खेळाडूसाठी आहार योजना तयार करण्यास उपयुक्त ठरले. या व्यतिरिक्त संपूर्ण शरीराचे विविध कोनातून आरोग्य आणि पुनप्राप्ती देखरेखीसाठी वापरले जाईल. यामुळे खेळाडू तंदुरुस्त राहण्यास मदत होईल. 

बायोइलेक्ट्रिकल प्रतिबाधा विश्लेषण (बीआयए) –

या शिबिरात स्नायूंच्या समतोल मूल्यमापनासाठी तसे दुखापतीचे धोके कमी करण्यासाठी मुद्रा आणि लवचिकता विश्लेषणासाठी या बीआयए तंत्राचा उपयोग केला जाईल. स्नायूंचा परिघ मोजण्यासाठी आणि स्नायूंचा विकास सुनिश्चित करण्यासाठी ३ डी बॉडी स्कॅनिंग तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. 

संपूर्ण शरीर प्रशिक्षण (इलेक्ट्रिकल मसल स्टिम्युलेशन) –

शिबिराचे ठळ वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण शरीराचे ईएमएस तंत्राद्वारे एकत्रीकरण केले जाईल. ही एक क्रांतीकारी पद्धत आहे, जी पारंपरिक प्रशिक्षणापेक्षा अधिक स्नायू सक्रिय करते. हे तंत्रज्ञान कार्यक्षम स्नायू बनविण्यासाठी, चरबी कमी करण्यासाठी आणि पुनर्वसनासाठी उपयुक्त ठरते. यामुळे खेळाडूंना सांधे ताणल्याशिवाय जलद सुधारणा करणे शक्य होते. या ईएमएस सत्रात स्नायू दुखणे आणि कडकपणा कमी करुन पुनप्राप्तीसाठी मदत करते. 

भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष श्री सुधांशु मित्तल यांनी स्पर्धा आणि या शिबिराबाबत कमालीची उत्सुकता बोलून दाखवली. ते म्हणाले, खो-खो विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित करताना आम्हाला आनंद होत आहे. हे प्रशिक्षण शिबिर खेळाडूंसाठी त्यांची क्षमता सिद्ध करण्यासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणारप आहे. आपल्या प्रतिभेवर बारीक लक्ष असल्याने आमचे समर्पित प्रशिक्षक या जागतिक स्पर्धांसाठी संघाला आकार देण्यासाठी मदत करतील. 

भारतीय खो-खो महासंघङाचे सरचिटणीस श्री एम.एस. त्यागी म्हणाले, साई आणि म्यास द्वारे समर्पित हे प्रशिक्षण शिबिर आमच्या विश्वचषक तयारीचा एक आधारस्तंभ आहे. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि अत्याधुनिक सुविधांखाली १२० खेळाडूंना प्रशिक्षण दिल्याने आम्हाला एक मजबूत आणि तंदुरुस्त संघ तयारप करता येणार आहे. या दृष्टिकोनाला सत्यात उतरविण्यासाठी श्री सुधांशु मित्तल यांनी पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. 

विश्वचषक स्पर्धेची उलटगणती सुरु होताच भारतीय सांस्कृतिक जडणघडणीत खोलवर रुजलेल्या खेळाच्या या भव्य उत्सवासाठी एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे. जगातील सर्वोत्कृष्ट खो-खो खेळाडूंचे एकत्र आणून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.