चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 27 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा 2025 साठी विविध विभागातील नामांकने जाहीर
एक असा पुरस्कार सोहळा ज्याची दरवर्षी नाट्यसृष्टी, चित्रपट सृष्टी आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात. होय तो पुरस्कार सोहळा म्हणजे चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत सांस्कृतिक कालादर्पण गौरव रजनी. यावर्षी हा 27 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी 2025 भव्य दिव्य पुरस्कार सोहळा दिनांक 8 मे 2025 रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता रवींद्र नाट्यमंदिर ,प्रभादेवी , मुंबई येथे पार पडत आहे. या भव्य दिव्य सोहळ्याला अनेक मान्यवर सेलिब्रिटींची तसेच सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या मंडळींची उपस्थिती असणार आहे.
चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रशेखर सांडवे यांनी 27 वर्षांपूर्वी लावलेलं सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळ्याचे हे रोपट आज एका वटवृक्षात रूपांतरित झालं आहे. आजवर हजारो कलाकारांना तसेच सामाजिक कार्य करणाऱ्यांना आपल्या उत्कृष्ट कामाबद्दल कौतुकाची थाप या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून मिळाली आहे आणि यापुढेही अशीच मिळत राहणार आहे.
पुरस्कार सोहळा म्हटलं की प्रत्येकाला प्रतीक्षा असते ती नामांकनाची. २७वा चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत सांस्कृतिक कालादर्पण गौरव रजनी-२०२५ पुरस्कार सोहळ्यातिल नामांकने आज जाहीर झाली असून सर्वांची प्रतीक्षा संपली आहे. एकूण चार विभागातील नामांकने चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री.चंद्रशेखर सांडवे यांनी नुकतीच जाहीर केली. नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका, आणि पत्रकारिता अशा चार विभागांसाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत.
नाटक विभागातील नामांकने
सर्वोत्कृष्ट नाटक :* वरवरचे वधूवर, मास्टर माइंड, उर्मिलायन, थेट तुमच्या घरातून, ऑल द बेस्ट, दोन वाजून बावीस मिनिटांनी. *सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक :* विजय केंकरे, प्रसाद खांडेकर, विराजस कुलकर्णी, देवेंद्र पेम, सुनील हरिश्चंद्र. *सर्वोत्कृष्ट लेखक :* प्रकाश बोर्डवेकर, प्रसाद खांडेकर, राजेंद्र ससाणे, विराजस कुलकर्णी, सुनील हरिश्चंद्र, स्मिता दादर आणि प्रसाद दाणी. *सर्वोत्कृष्ट अभिनेता :* भाऊ कदम, प्रसाद खांडेकर, सुब्रत जोशी, अंशुमन विचारे, अनिकेत विश्वासराव, प्रभाकर मोरे. *सर्वोत्कृष्ट अभिनेत्री :* स्पृहा जोशी, सखी गोखले, निहारिका राजदत्त, गौतमी देशपांडे, रंजना म्हापदी, अश्विनी कुलकर्णी. *सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता :* अजय पाटील, सुरज पारसनीस, अविनाश नारकर, प्रियदर्शन जाधव, ओमकार राऊत, ऋषिकेश बांबुर्डेकर. *सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री :* वीणा शिखरे, कल्पिता राणे, नम्रता संभेराव, रसिका सुनील, वनमाला वेदे, अनुपमा ताकमोघे. *सर्वोत्कृष्ट विनोदी कलावंत :* प्रथमेश शिवलकर, आशिष पवार, मनमित पेम, दिपाली जाधव, सुनील पाटेकर. सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : शितल तळपदे, चेतन ढवळे, सिद्धेश नांदलस्कर, प्रदीप मुळे, कुमार सोहनी. *सर्वोत्कृष्ट नेपथ्य :* प्रदीप मुळे, नीरज शिरवईकर, रजनीश कोंडविलकर, अरुण राधायान, संदेश बेंद्रे, सुशील पांचाळ. *सर्वोत्कृष्ट संगीत :* अशोक पत्की, सुनील कांबळे, निनाद म्हैसाळकर, निषाद गोलांबरे, अजित परब. *सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत :* अशोक पत्की, सुनील कांबळे, निनाद म्हैसाळकर, निषाद गोलांबरे सुश्मित लिमये. *सर्वोत्कृष्ट रंगभूषा :* उदयराज तांगडी, राजेश परब, उल्लेश खंदारे, संदीप नगरकर, प्रदीप धरणे. *सर्वोत्कृष्ट वेशभूषा :* मंदार तांडेल, सुनीहार, पौर्णिमा ओक, ईशान देसाई, कल्याणी गुगळे, मयूर रानडे. *लक्षवेधी अभिनेता :* अजय पुरकर, आस्ताद काळे, मयुरेश पेम. लक्षवेधी अभिनेत्री : धनश्री दळवी, प्रियंका तेडोंलकर, आदिती सारंगधर. यातील विनोदी नाटक आणि लक्षवेधी नाटक ही दोन नामांकने गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
टीव्ही मालिका विभाग नामांकने
सर्वोत्कृष्ट मालिका : आदिशक्ती, घरोघरी मातीच्या चुली, सुख कळले, लय आवडतेस तू मला, ठरलं तर मग, सोहळा सख्यांचा. *सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक :* राहुल भुते/दिनेश मिरगल ,सचिन मोहिते, सचिन गोखले, अनिकेत साने, राहुल लिंगायत, विनय नलावडे. *सर्वोत्कृष्ट अभिनेता :* सुनील पूसावळे, अतुल आगलावे, तन्मय जक्क, अमित भानुशाली, सागर देशमुख. *सर्वोत्कृष्ट अभिनेत्री :* जुई गडकरी, स्पृहा जोशी, सानिका मोजर, राजसी चिटणीस, रेश्मा शिंदे. *सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता :* संजय खापरे, प्रमोद पवार, अनिरुद्ध जोशी, चैतन्य सरदेशपांडे, आशुतोष पत्की. *सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री :* अपूर्वा सकपाळ, शिल्पा नवलकर, स्वाती देवल, प्राजक्ता कुलकर्णी-दिघे, प्रतीक्षा मुणगेकर. *सर्वोत्कृष्ट कथा :* सचिन मोहिते जीत बोडींगे, मनीष कदम, अश्विनी शेंडे, अश्विनी अंगढ, अभिजीत गुरु/अश्विनी शेंडे. *सर्वोत्कृष्ट छायांकन :* राजेश नडोने, संदीप शिंदे, अभिषेक शुक्ला, मुनाफ नाईक.
पत्रकारिता पुरस्कार नामांकने
सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनल : लोकशाही मराठी, TV 9 मराठी, न्युज 18 लोकमत, ABP माझा, NDTV मराठी.
सर्वोत्कृष्ट पत्रकार : राज चिंचणकर, महेंद्र सुके, अतुल कुलकर्णी, नितीन फणसे.
सर्वोत्कृष्ट वृत्त निवेदक : अमय रानडे, विलास बडे, कविता राणे, स्नेहील शिवाजी, सागर जोशी, प्रसन्न जोशी.
सर्वोत्कृष्ट महिला वृत्त रिपोर्टर : अतीशा लाड, मधुरा शिधये, संचिता ठोसर, अंकिता लोखंडे, नेहा प्रभू, स्नेहल सांबरे.
सर्वोत्कृष्ट पुरुष वृत्त रिपोर्टर : निलेश अडसूळ, विनोद घाडगे, संदेश कामेरकर, वैभव बागकर, नितीन मोरे, श्रीरंग खरे.
चित्रपट विभाग नामांकने
सर्वोत्कृष्ट चित्रपट :
शक्तिमान, घरत गणपती, मुक्काम पोस्ट देवाचे घर, नवरदेव बीएससी ऍग्री, फुलवंती ,स ला ते स ला ना ते. *सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक :*
प्रकाश कुंटे नवज्योत बांदिवडेकर, संकेत माने, स्नेहल तरडे, राम खाटमोडे, संतोष कोल्हे.
सर्वोत्कृष्ट कथा :
संकेत माने, प्रकाश कुंटे, राम खाटमोडे रमेश चौधरी, रवी नागपुरे, आनंद गोखले.
सर्वोत्कृष्ट पटकथा :
प्रकाश कुंटे, प्रवीण तरडे, नवज्योत बांदिवडेकर/अनिल सुतार/वैभव चिंचाळकर, श्रीकांत बोजेवार/तेजस घारगे/संतोष कोल्हे, सुमित गिरी/संकेत माने, संजय नवगिरे/मिलिंद कवडे.
सर्वोत्कृष्ट संवाद :
वैभव चिंचाळकर/चेतन सैंदने, राम खाटमोडे/विकास वनवे, श्रीकांत बोजेवार/तेजस घारगे, प्रकाश कुंटे/प्रणव आपटे, प्रवीण तरडे, जितेंद्र बर्डे.
सर्वोत्कृष्ट अभिनेता :
क्षितिज दाते, आदिनाथ कोठारे, गश्मीर महाजनी, साईकित कामत, शरद केळकर, सुबोध भावे, स्वप्निल जोशी.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री :
प्रियदर्शनी इंदलकर, प्राजक्ता माळी, ऋचा अग्निहोत्री, भक्ती घोगरे, तेजश्री प्रधान, निकिता दत्ता.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: अजिंक्य देव, प्रियदर्शन जाधव, वैभव मांगले, सचिन नारकर, संतोष जुवेकर, प्रसाद ओक.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : विना जामकर, चिन्मय सुमित, स्पृहा जोशी, अश्विनी भावे, श्रुती मराठे, कल्याणी मुळये.
सर्वोत्कृष्ट बालकलाकार : रुद्रम बर्डे, मायरा वायकुळ, ईशान कुंटे, विराज लटके, आदित्य पाटील, स्पृहा परब.
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता : मकरंद अनासपुरे, गौरव मोरे, सिद्धार्थ जाधव, ऋषिकेश जोशी, समीर खांडेकर, संदीप पाठक.
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री : विशाखा सुभेदार, शुभांगी गोखले, गार्गी फुले, मेघा शिंदे, प्राजक्ता हनमघर, सुकन्या मोने.
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :
राहुल ठोंबरे, गणेश आचार्य, राहुल-हर्ष, उमेश जाधव, सुमित कुमार. सर्वोत्कृष्ट गीतकार : कुणाल-राम, कुणाल-करण मंगेश कांगणे, अलोक सुतार, मंदार चोळकर, विक्रांत हार्णिक.
सर्वोत्कृष्ट संगीत :
वरूण लिखाते, अविनाश-विश्वजीत, अजय-अतुल, चिनार-महेश, कुणाल-करण, संकेत माने.
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक :
अजय गोगावले, अभय जोधपूरकर, ऋषिकेश रानडे, राहुल देशपांडे, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे.
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका :
वैशाली माडे, आर्या आंबेकर, सायली खरे, श्रेया घोषाल, स्वरा बनसोडे, कविता राम.
सर्वोत्कृष्ट संकलन :
दिनेश पुजारी/नयनेश डिंगणकर, मयूर हरदास, आशिष म्हात्रे, सचिन नाटेकर, सुबोध नारकर.
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत :
आदित्य बेडेकर, प्रज्वल यादव, संकेत साने, अविनाश-विश्वजीत, अभिनय जगताप.
सर्वोत्कृष्ट छायांकन :
गौरव पोंक्षे, महेश लिमये, प्रसाद भेंडे/शैली शर्मा, रोहन मडकईकर, संजय मेमाणे, सेतू श्रीराम.
सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक :
सतीश चीतकर, मयूर पवार, सुमित पाटील, गुड्डू खान, एकनाथ कदम, निशा जुबे.
सर्वोत्कृष्ट रंगभूषा :
अभिषेक पवार, महेश भराटे, सुनील पवार, राजेश वाळवे, समीर कदम, दशरथ खापडे.
सर्वोत्कृष्ट वेशभूषा :
मानसी अतारडे, अपूर्ण सुर्वे/महेश शेरला, शरयू तायडे, कल्याणी कुलकर्णी. अब्दुल शेख, अपेक्षा गांधी. *विशेष लक्षवेधी व्यक्तिरेखा :*
शिवाली परब, जितेंद्र बर्डे, शिवानी सुर्वे, समीर धर्माधिकारी, स्वाती गोतावले, राज मिसाळ. विशेष *सामाजिक चित्रपट :*
छबीला, मोऱ्या, मंगला.
दरम्यान चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी 2025 तर्फे *”सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार” ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभुणे* यांना देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर सांडवे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. चंद्रशेखर सांडवे, रमेश मोरे, सुनील खेडेकर डॉ संतोष पोटे, मनोहर सरवणकर , अशोक कुलकर्णी आदी मान्यवर सहभागी असलेल्या समितीने हा निर्णय एकमताने घेतला.
पत्रकारिता विभागासाठी सन्माननीय परीक्षक चंद्रशेखर सांडवे, सुनील खेडेकर, आराधना देशपांडे, गणेश गारगोटे यांनी काम पाहिले. तर नाट्य विभागासाठी सन्माननीय परीक्षक भालचंद्र कुबल, मनोहर सरवणकर, सतीश आगाशे, राज पाटील, रवींद्र आवटी, शिरीष घाग आणि रसिक प्रेक्षकांच्या मतदानाद्वारे केलेल्या आधारे नामांकन जाहीर करण्यात आली. चित्रपट विभागासाठी सन्माननीय परीक्षक रमेश मोरे, मनोहर सरवणकर, आराधना देशपांडे, सुनील खेडेकर, अशोक कुलकर्णी, विजय राणे आणि रसिक प्रेक्षकांच्या मतदाना आधारे नामांकन जाहीर करण्यात आले. आणि टीव्ही मालिका विभागासाठी सन्माननीय परीक्षक सुनील खेडेकर, तन्मय सांडवे, आराधना देशपांडे यांच्या परिक्षणातून नामांकन जाहीर करण्यात आली.
चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 27 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी 2025 हा दैदीप्यमान पुरस्कार सोहळा दिनांक 8 मे 2025 रोजी मुंबई येथे सायंकाळी सहा वाजता रंगणार असून हा पुरस्कार सोहळा याची देही याची डोळा पाहण्याची संधी रसिक प्रेक्षकांनी घ्यावी असे आवाहन चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रशेखर सांडवे यांनी केले आहे.