क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

पुणे टाइम्स फॅशन वीक २०२५ चा दुसरा दिवस: अभिनवता आणि ग्लॅमरचा प्रकाशझोत!

पुणे, २६ एप्रिल २०२५ : पुणे टाइम्स फॅशन वीक २०२५ चा दुसरा दिवस समकालीन सिल्हेट्स, डिझाइनमधील विविधता आणि उदयोन्मुख प्रतिभेचा एक उत्साही सोहळा ठरला. पुणे टाइम्स फॅशन वीक २०२५ चा दुसरा दिवस नैसर्गिक कला आणि नजाकतीसह सादर झाला.

दिवसाची सुरुवात एमआयजीए फॅशन इन्स्टिट्यूटने ‘उडाण २०२५’ सह केली — प्रायोगिक डिझाइन, ठळक अभिव्यक्ती आणि ज्वलंत रंगसंगतीने परिपूर्ण अशी एक क्रिएटिव्ह झलक, जी फॅशनमधील पुढील पिढीच्या visionaries वर प्रकाश टाकणारी होती. अक्षता शोस्टॉपर म्हणून लक्षवेधी ठरली.

पुढे, प्रीती जाजू यांच्या ‘प्रीती जाजू लेबल’ने परिष्कृत साधेपणाचा एक अप्रतिम नमुना सादर केला. या संग्रहात क्लासिक कट्स आणि शांत सौंदर्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते, जे साधेपणातही उठून दिसणारे आकर्षण निर्माण करत होते. श्रुती मराठे यांनी शोस्टॉपर म्हणून रॅम्पवर मोहकता आणि सुसंस्कृतपणा आणला.

नंदिता यांच्या देखण्या आकृतीने ‘ईश्वर्या’ कलेक्शन सादर झाले, जे स्त्रीत्वाच्या विशालतेचे प्रतीक होते; प्रवाही रेखाटनं आणि सूक्ष्म नक्षीकामाने त्याला अतिरिक्त रंगत प्राप्त झाली होती. नंदिता यांनी प्रत्येक डिझाइनमध्ये दैवी शक्तींपासून प्रेरणा घेत विष्णूची ताकद, दुर्गाचे धैर्य, लक्ष्मीची Elegance आणि गणेशाचे ज्ञान या सर्वांची एकत्रित अध्यात्मिक शक्ती आणि कृपा एका रूपात सादर केली. सोनाली कुलकर्णी, इशिता राज आणि प्रांजल प्रिया यांनी शोस्टॉपर्स म्हणून या इटर्नल व्हिजनला जिवंत केले.

संस्कृती आणि वारशाने समृद्ध असलेल्या ‘पेशवाई श्रीमंत’ या ब्रँडने || तदेव लग्नम् || – एक आगळं-वेगळं वेडिंग कलेक्शन सादर केलं. या संग्रहात पारंपरिक शैलीतील नक्षीकाम आणि आधुनिक संवेदनशीलतेचं सुरेख मिश्रण पाहायला मिळालं. वैदेही परशुरामीने शोस्टॉपर म्हणून आपल्या सहज तेजस्वितेने आणि सौम्य आत्मविश्वासाने प्रेक्षकांची मने जिंकली.

संध्याकाळचा नाट्यमय समारोप सॉलिटेरिओने फ्यूजन ब्रायडलवेअरच्या आकर्षक प्रदर्शनासह अर्चिता कोचरला सादर करून केला. अर्चिता अतिशय ग्लॅमरस आणि परिष्कृत सौंदर्याने परिपूर्ण होती. निम्रत कौरने शोस्टॉपर म्हणून आपल्या देखण्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले, एलिगन्स आणि edge यांचे उत्कृष्ट मिश्रण साकारत तिने दुसऱ्या दिवसाची भव्य सांगता केली.

पुणे टाइम्स फॅशन वीक २०२५ साठी बबल कम्युनिकेशनने अधिकृत मीडिया आणि इन्फ्लुएन्सर पार्टनर म्हणून काम पाहिले. या इव्हेंटच्या कथानकाला आकार देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. प्रभावी कथा तयार करून, मीडिया दृश्यमानता वाढवून आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रभावी संवाद साधून, बबलने इव्हेंटची पोहोच रनवेच्या पलीकडे नेली आणि डिझायनर्स, सेलिब्रिटी तसेच प्रेक्षक यांना सहजपणे एकत्र जोडले.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.