उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष सत्कार
पत्रकार कल्याणकारी महामंडळ आश्वासन व मंजूरी! पत्रकार क्षेत्रातील ऐतिहासिक कार्यासाठी
बहिण माझी लाडकी योजनेचे प्रणेते व त्यामुळे* *महाराष्ट्रातील सर्व “बहिणींचे भाऊ” अशी प्रतिमा तयार झालेले ना.एकनाथ शिंदे!
पत्रकार बहिणीच्या मदतीला पुढे आले.
इतर तीन स्तंभांप्रमाणे पत्रकारांना खरा सन्मान मिळावा म्हणून ,*पत्रकार नोंदणीसह कल्याणकारी महामंडळ* बनावे म्हणून *आमरण उपोषणाला बसलेल्या शीतल हरीष करदेकर, यांचे उपोषण तत्कालिन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी थांबवले,ते पत्रकार मंहामंडळ करण्याचे लिखित आश्वासन देऊन!*
नंतर *महामंडळाला मंत्री मंडळाची मंजुरी ही मिळाली ती ना. शिंदे मुख्यमंत्री असतानाच!*
याच, *पत्रकार क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी व योगदानासाठी* आज सह्याद्री वर या बहिणीने सर्व पत्रकारांच्या वतीने *”मीडिया एक्सेलन्स अवाँर्ड २०२५” मधील त्यांच्या विशेष सन्मानाचेपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.*
पत्रकार आणि महिलांसाठी काम करणाऱ्या “मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया” च्या (माई) अध्यक्ष व “माईमीडिया२४” च्या संस्थापक शीतल हरीष करदेकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात ” प्लँनेट मराठी”च्या सहकार्याने
“मीडिया एक्सेलन्स अवाँर्ड २०२५ चे” आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
आशयपुर्ण व समाजहिताचे विषय या कार्यक्रमात लोककला व संगीत यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले।
“थँलसेमिया मुक्त महाराष्ट्र” हा मुख्य विषय माई मीडिया च्या वतीने घेण्यात आला होता.
तसेच पत्रकार हितसाठीसाठी भारूड ,आदिशक्ती ला जोगव्यातून साकड़ घालण्यात आलं.
संतोष पवार यांच्या कलावंत टिमने शेतकऱ्यांवरील वगनाट्य धर्तीववरील नाट्य प्रवेश सादर केला.
पत्रकारासह मनोरंजन व राजकीय क्षेत्रात ऐतिहासिक काम करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गुणीजनांना सन्मानित करण्यात आले.