क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पावसाळ्यात आता थरार, रहस्य आणि डब मराठी चित्रपटांचा मेगा वर्षाव!

मुंबई ८ जुलै २०२५ : ‘जुलै’ महिन्याच्या सुरुवातीला जसा श्रावणाचा सडा आणि पावसाचा जोर वाढतो, अगदी त्याचप्रमाणे अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर आता कंटेंटचा जोरदार वर्षाव सुरू होणार आहे. या जुलै महिन्यात प्रत्येक शुक्रवार तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत भन्नाट सिनेमे, धमाल वेब सिरीज आणि साऊथमधील ब्लॉकबस्टर फिल्म्स, तेही तुमच्या लाडक्या मायबोली मराठीत. चला तर मग, या जुलै महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी थरारक आणि मजेशीर कंटेंटचा हा खजिना पाहण्यासाठी सज्ज व्हा.आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार, कधीही आणि कुठेही या धमाकेदार मनोरंजनाचा आनंद घेऊ शकता.

कोईम्बतूर रहस्य (सी-सॉ) : गुन्हा, मानसिक स्थिती आणि संशयाचे जाळे

‘सी-सॉ’ हा गुणा सुब्रमण्यम दिग्दर्शित, तमिळ भाषेतील एक दमदार क्राइम, ड्रामा आणि थ्रिलर चित्रपट आहे. ही कथा इन्स्पेक्टर मुगिलनच्या तपासाभोवती गुंफलेली आहे, ज्याला एका व्यावसायिकाच्या नोकराच्या खूनप्रकरणाची चौकशी करण्यासाठी बोलावले जाते. तपासादरम्यान, धक्कादायकपणे तो व्यापारी आणि त्याची पत्नी अचानक बेपत्ता होतात. जसा तपास पुढे सरकतो, तसा मुगिलनचा संशय त्या व्यावसायिकावर अधिक गडद होतो, कारण त्याचा मानसिक भूतकाळ आणि सद्यस्थितीतील वर्तन संशयास्पद वाटू लागते. सतत बदलणाऱ्या शक्यतांनी आणि अनपेक्षित घटनांनी भरलेला हा चित्रपट मानवी मनाच्या गुंतागुंतीचे उत्तम चित्रण करतो. हा तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपट मायबोली मराठीत ११ जुलै २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

अन्यायाचा थरार (जुलिएट २) : अंधारलेल्या भूतकाळाशी झुंजणारी जुलिएट*

‘जुलिएट २’ हा वीराट बी. गोवडा दिग्दर्शित कन्नड भाषेतील एक धमाकेदार ॲक्शन, क्राईम आणि थ्रिलर चित्रपट आहे. ही कथा जुलिएट नावाच्या एका स्वावलंबी तरुणीभोवती फिरते, जिचे तिच्या वडिलांशी एक अतूट भावनिक नाते आहे. एक रात्री जुलिएट एका भयानक घटनेची साक्षीदार होते, जी तिच्या भूतकाळातील दुःखद आठवणींना पुन्हा उजाळा देते. या अंधाऱ्या आठवणींचा सामना करत, जुलिएट त्या भीषण वास्तवाला धैर्याने सामोरी जाते. तिच्या हिंमतीची आणि सहनशक्तीची ही परीक्षा प्रेक्षकांना एक अस्वस्थ करणारा आणि थरारक अनुभव देते. या जबरदस्त कन्नड चित्रपटाचा मराठी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर १८ जुलै २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे.

वचनबद्ध : नियतीच्या निर्णयावर आयुष्याची कसोटी*

साधं, शांत आयुष्य जगण्याची इच्छा असलेल्या एका तरुण मुलीच्या आयुष्यात अचानक ‘क्षयरोग’ या गंभीर आजाराचे निदान झाल्याचे समजतं आणि तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. तिच्यावर ओढवलेल्या या अनपेक्षित संकटामुळे ती मानसिक, शारीरिक आणि सामाजिक अशा तिन्ही पातळीवर झुंजायला लागते. संकटांमध्ये भरडली गेलेली ही मुलगी देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि असा एक निर्णय घेते, ज्याचे परिणाम तिला संपूर्ण आयुष्यभर भोगावे लागतात. ‘वचनबद्ध’ हा मराठी भाषेतील कौटुंबिक ड्रामा असून सुबोध भावे, श्रेयस तळपदे आणि श्रीकांत मोगे यांसारख्या मराठी सिनेसृष्टीतील अनुभवी कलाकारांच्या प्रभावी अभिनयाने सजलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर येत्या २५ जुलै २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

अंतिम सत्य (पार्वती नगर) : गुन्हेगारी, तपास आणि मानवी मनाच्या गूढतेची कहाणी

अंतिम सत्य (पार्वतीनगर) हा तक्षशील सोनटक्के दिग्दर्शित एक उत्कंठावर्धक हिंदी क्राइम, मिस्ट्री आणि थ्रिलर चित्रपट आहे. ही कथा श्वेता नावाच्या एका वेश्येच्या रहस्यमय खुनाभोवती फिरते, ज्यात तिचा माजी प्रियकर अरविंद मुख्य संशयित असतो. पोलिसांचा संशयाचा काटा त्याच्याकडे वळला असला तरी, पुराव्याअभावी खरा गुन्हेगार शोधणे अधिक गुंतागुंतीचे होते. तपासादरम्यान, श्वेताचा मित्र महेश आणि तिचा पती संदीप यांच्यावरही संशय येतो. मात्र, पोलिसांना एक अशी धक्कादायक माहिती मिळते, जी या खुनामागे दडलेल्या भयानक सत्याचा उलगडा करते. खोट्या चेहऱ्यांमागे लपलेले सत्य कधी आणि कसे समोर येईल, याची गूढता हेच ‘अंतिम सत्य’ (पार्वतीनगर) या चित्रपटाच्या कथानकाचे मुख्य बलस्थान आहे. या उत्कंठावर्धक रहस्यकथेचा प्रीमियर मराठी भाषेत ०४ जुलै २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे.

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “पावसाळ्याच्या गारव्यात प्रेक्षकांच्या मनोरंजनात रंग भरताना, आम्ही दमदार आणि थरारक मराठी कंटेंट घेऊन आलो आहोत. आमचे उद्दिष्ट फक्त करमणूक देण्यापुरते नाही, तर प्रत्येक कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी, त्यांना विचार करायला लावणारी आणि दीर्घकाळ लक्षात राहणारी असावी, हे आहे. शिवाय, अल्ट्रा झकासच्या माध्यमातून आम्ही असेच दर्जेदार व मराठी अस्मितेला साजेसे कंटेंट आणत राहू.”शिवाय अल्ट्रा झकास प्लॅटफॉर्म Android, iOS, टॅब, वेब, Android TV, Fire TV, Jio Store आणि Cloud TV वर सहज उपलब्ध आहे. त्यामुळे प्रेक्षकांना याचा आनंद कधीही, कुठेही घेता येईल.

Media Queries Vanshika 9324071021 Shraddha 9869100555 ashwinipublicity@gmail.com

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.