एक कडक शिस्तीची आहे तेजश्री ताई, किस्सा असा की… – राज मोरे
भाऊ-बहीण या नात्यातील गोडवा, प्रेम आणि समजूतदारपणाची एक हृदयाला भिडणारी नवी मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ मधून पाहायला मिळणार आहे. मालिकेतील कथा जशी भावनिक आणि गुंतवून ठेवणारी आहे, तशीच या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांमधील ऑफस्क्रीन नातसुद्धा विशेष लक्षवेधी ठरत आहे. नुकत्याच झालेल्या शूटचा एक किस्सा अभिनेता राज मोरे य्याने शेयर केला जिथे बहिणीची भूमिका साकारत असलेली *अभिनेत्री तेजश्री प्रधान (ताई)* कडून मिळालेला सल्ला आणि सहकार्य यामुळे टीममध्ये एक सकारात्मक ऊर्जा जाणवते. “आमच्या शूटला जास्त दिवस नाही झालेत, पण माझा आणि तेजश्री ताईचा ऑफस्क्रीन बॉण्ड खूप छान झाला आहे. ती एक कडक शिस्तीची आहे हे मला इतक्या दिवसात तिच्या सोबत काम करून कळलं आहे. ती मला सांगते कि आपण असं करू म्हणजे सीन अजून फुलून येईल, ती तांत्रिकदृष्ट्या चांगला सल्ला देते. जसं कधी एखादा शब्द घ्यायचा असतो तर तिला तो छान सुचतो आणि त्याचा मलाही खूप फायदा होतो. मला एक परफेक्ट सिनियर प्रमाणे तेजश्री ताईचं मार्गदर्शन मिळतय, ज्याचा एक कलाकार म्हणून खूप फायदा ही होत आहे. ती खात्री करते की फक्त तिचे कामच नाही तर आमच्या सर्वांचे कामही छान व्हायला हवं आणि त्यासाठी तिचे प्रयत्न असतात, कारण सगळं छान असेल तर शो भरभराटीला येईल. मालिकेच्या प्रोमो मध्ये दाखवले आहे कि ती माझ्यासाठी लग्न करत आहे, आणि मालिकेत तुम्हाला ते बघायला मिळेल कि काय हट्ट आहे जो मी तिच्याशी करतो आणि तिला लग्न करावे लागत. गोष्ट खूप सुंदर लिहली आहे आणि मी आवर्जून सांगेन कि मालिका तुम्ही नक्की बघा.”
तेव्हा बघायला विसरू नका ‘वीण दोघातली ही तुटेना’ ११ ऑगस्ट पासून सोम ते शनि संध्या. ७:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.